Join us
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षामध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 14:07 IST

तक्रारदार मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरोधात जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुंबई : कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या १६ वर्षीय नेपाळच्या मुलीशी एका तरुणाने ओळख करून तिला जुहूमध्ये नेत तिच्यावर रिक्षामध्ये बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. तक्रारदार मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरोधात जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार २५ वर्षीय तरुणी ही तिच्या लहान बहिणीसोबत अंधेरीत  रहाते. आरोपी तरुणाने १६ वर्षीय मुलीशी ओळख केली. त्यानंतर त्याने २३ जुलैला आपला वाढदिवस असल्याचे सांगत या मुलीला भेटायला बोलावले. मुलगी भेटायला आल्यानंतर त्याने तिला जुहू चौपाटीवर रिक्षामध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस