कामाचा माणूस! TCची कमाल कामगिरी, ११ महिन्यांत रेल्वेला १ कोटी कमवून दिले; किती प्रवासी पकडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 09:41 IST2026-03-17T09:39:45+5:302026-03-17T09:41:27+5:30

Central Railway TTI News: या चालू आर्थिक वर्षात हा टप्पा गाठणारे रेल्वेचे पहिले तिकीट तपासणी कर्मचारी ठरले आहेत.

a man of work central railway tti outstanding performance earned to the railways 1 crore in 11 months know on how many passengers take action | कामाचा माणूस! TCची कमाल कामगिरी, ११ महिन्यांत रेल्वेला १ कोटी कमवून दिले; किती प्रवासी पकडले?

कामाचा माणूस! TCची कमाल कामगिरी, ११ महिन्यांत रेल्वेला १ कोटी कमवून दिले; किती प्रवासी पकडले?

Central Railway TTI News: गेल्या वर्षभरात रेल्वेने विशेष मोहीम राबवत फुकट्या प्रवाशांवर कडक कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये रेल्वेला कोट्यवधीचा महसूल प्राप्त झाला. तसेच बिनधास्त विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १० टक्क्यांनी वाढल्याचेही निदर्शनास आले. यातच एक तिकीट तपासनीस रेल्वेसाठी कामाचा माणूस ठरला आहे. गेल्या ११ महिन्यात नियम धाब्यावर बसवत प्रवास करणाऱ्या ११ हजारांहून अधिक प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करत रेल्वेला तब्बल १ कोटींहून जास्तची कमाई करून दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील तिकीट तपासनीसाने दंड वसुलीत एक कोटी रुपयांचा टप्पा पार करत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 'ओपन डिटेल बॅच'चे 'ट्रॅव्हलिंग टिकिटिंग इन्स्पेक्टर' मोहम्मद शम्स चांद यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये तिकीट तपासणीद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नाचा १ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. 

या कामगिरीमुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने उंचावली

मोहम्मद शम्स यांनी आर्थिक वर्ष २०२५-२६ (दिनांक ०१.०४.२०२५ ते १५.०३.२०२६) दरम्यान ११,४८३ प्रकरणांची नोंद करत, तिकीट तपासणीद्वारे १,००,३८,५०५/- रुपयांचे  उत्पन्न नोंदवले; या चालू आर्थिक वर्षात हा टप्पा गाठणारे ते मध्य रेल्वेचे पहिले तिकीट तपासणी कर्मचारी ठरले आहेत. त्यांची निष्ठा आणि उत्कृष्ट कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे; यामुळे रेल्वे महसुलाचे होणारे मोठे नुकसान वाचवण्यात मोलाचा हातभार लागला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे तिकीट तपासणी विभागाची प्रतिष्ठा खऱ्या अर्थाने उंचावली असून, इतरांनी अनुकरण करावे असा एक प्रेरणादायी आदर्श त्यांनी निर्माण केला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रवाशांना आवाहन करते की, कृपया अधिकृत विक्रेते, रेल्वे स्थानकावरील बुकिंग खिडक्या, एटीव्हीएम किंवा http://www.irctc.co.in या संकेतस्थळाद्वारे जारी केलेली वैध तिकिटे घेऊनच प्रवास करावा. प्रवासी त्यांच्या मोबाईल फोनवर 'Rail One' ॲप डाउनलोड करून त्याद्वारे तिकिटे आरक्षित करू शकतात. विनातिकिट प्रवासाबाबतच्या आपल्या 'शून्य-सहिष्णुता' धोरणाचा रेल्वेकडून पुनरुच्चार करण्यात येत असून, प्रवाशांना आरामदायी आणि सन्मानजनक प्रवास अनुभवता येईल, याची खात्री करण्यासाठी रेल्वे कटिबद्ध आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title : समर्पित टीसी ने 11 महीनों में रेलवे को ₹1 करोड़ कमाए

Web Summary : मुंबई में एक टिकट चेकर ने 11 महीनों में 11,000 से अधिक बिना टिकट यात्रियों पर जुर्माना लगाकर मध्य रेलवे के लिए ₹1 करोड़ से अधिक की कमाई की। इस उत्कृष्ट प्रदर्शन से राजस्व में काफी वृद्धि हुई और टिकट निरीक्षण दक्षता के लिए एक उच्च मानक स्थापित किया गया, जिससे यात्रियों को वैध टिकट के साथ यात्रा करने के लिए प्रोत्साहित किया गया।

Web Title : Dedicated TC Earns Railway ₹1 Crore in 11 Months

Web Summary : A ticket checker in Mumbai earned Central Railway over ₹1 crore in 11 months by penalizing over 11,000 ticketless travelers. This outstanding performance significantly boosted revenue and set a high standard for ticket inspection efficiency, encouraging passengers to travel with valid tickets.