देशातील सर्वात व्यस्त असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. धावपट्टीवर हालचाल करत असताना एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांच्या विमानांचे पंख एकमेकांना जोरात धडकले. या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या अपघातात दोन्ही विमानांमधील प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
नेमकी घटना कशी घडली?
ही विमानांच्या ग्राउंड मूव्हमेंट दरम्यान घडली. एअर इंडियाचे विमान (एआय २७३२) मुंबईहून कोईम्बतूरला जाण्यासाठी पुशबॅक घेत होते. त्याच वेळी, हैदराबादवरून आलेले इंडिगोचे विमान (६ ई ७९१) लँडिंगनंतर पार्किंगच्या दिशेने टॅक्सी अर्थात हळूवार सरकत होते. याच गडबडीत दोन्ही विमानांचे विंगटिप्स एकमेकांना धडकले.
प्रवाशांचा जीव भांड्यात पडला
अपघाताच्या वेळी दोन्ही विमानांमध्ये प्रवासी पूर्ण क्षमतेने भरलेले होते. विमानांना धक्का बसताच प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, एअरपोर्ट प्रशासनाने आणि क्रू मेंबर्सनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही विमानांना तातडीने थांबवून सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. या विमानांना तांत्रिक तपासणीसाठी सध्या ग्राऊंडेड करण्यात आले असून प्रवाशांसाठी पर्यायी विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
विमान कंपन्यांची अधिकृत भूमिका
एअर इंडिया: "कोईम्बतूरला जाणाऱ्या विमानाचा पंख दुसऱ्या विमान कंपनीच्या विमानाला लागला. विमानाचे नुकसान झाले असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विमान तपासासाठी पाठवण्यात आले आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी सोय केली जात आहे."
इंडिगो: "हैदराबादहून मुंबईला आलेल्या विमानाच्या पंखाचा टोक टॅक्सी करताना दुसऱ्या विमानाला लागला. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. प्रोटोकॉलनुसार सर्व संबंधित यंत्रणांना या घटनेची माहिती देण्यात आली असून अंतर्गत चौकशी सुरू आहे."
सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह?
मुंबई विमानतळासारख्या हाय-टेक एअरपोर्टवर एटीसी निर्देशात चूक झाली की ग्राउंड हँडलिंगमध्ये हलगर्जीपणा झाला, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. डीजीसीए या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून, दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Web Summary : A major accident was narrowly avoided at Mumbai Airport when an Air India and Indigo plane collided on the runway. No injuries were reported. An Air India plane was pushing back when its wing hit an Indigo plane taxiing. Both planes are grounded for inspection.
Web Summary : मुंबई एयरपोर्ट पर एक बड़ा हादसा टल गया जब एयर इंडिया और इंडिगो के विमान रनवे पर टकरा गए। कोई घायल नहीं हुआ। एयर इंडिया का विमान पीछे हट रहा था तभी उसका पंख इंडिगो के टैक्सी कर रहे विमान से टकरा गया। दोनों विमानों को निरीक्षण के लिए खड़ा किया गया है।