महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:58 IST2025-12-15T18:58:29+5:302025-12-15T18:58:54+5:30

ठाण्यातही साकारणार भारतातील सर्वांत उंच व्हिवींग टॉवर, स्नो पार्क

A magnificent Central Park will be built on Mahalaxmi Racecourse; Municipal Corporation presents the plan | महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण

महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण

मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडची मोकळी जागा मिळून एकूण २९५ एकरवर जागतिक दर्जाचे सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. प्रस्तावित सेंट्रल पार्कचा आराखडा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, आर्किटेक्ट हाफीज कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते. मुंबईकरांसाठी आजवरचे हे सर्वात मोठे गिफ्ट असून हे या ठिकाणी कोणतंही कॉक्रिटचे होणार नाही. हे सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे. रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२५ एकरवर जागतिक दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी होतेय. कोस्टल रोडची १७० एकर जागा असे एकूण २९५ एकरचे भवदिव्य सेंट्रल पार्क तयार केले जाणार आहे. तसेच सेंट्रल पार्कखाली १० लाख चौरस फुटांचे जागतिक दर्जाच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही विकसित केले जाणार आहे. यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळांसह खेळ, खो-खो, कबड्डी, अशा मराठमोळ्या खेळांसाठीही सुविधा उपलब्ध होईल. हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यावरण पूरक आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सेंट्रल पार्कमध्ये फिरताना मुंबईकरांना अश्वशर्यतीही पाहता येतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. सेंट्रल पार्कच्या भूपृष्ठावर पदपथ वगळता कोणतेही बांधकाम नाही. हे संपूर्ण उद्यान असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. येथे सुरळीत वाहतूक नियोजनच्या दृष्टीने हे सेंट्रल पार्क १२०० मीटर भूमिगत मार्गाने कोस्टल रोडशी जोडला जाणार आहे. यासाठी ५५० कोटींचे टेंडर काढण्यात आले आहे. या सर्व प्रकल्पांचे डिझाईन हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांनी केले आहे.

सेंट्रल पार्कच्या कनेक्टिव्हीटीबाबत बोलताना आयुक्त भूषण गगराणी म्हणाले की या पार्कसाठी मेट्रो ३ मार्गावर नेहरु विज्ञान केंद्र हे जवळचे स्टेशन आहेत. या स्टेशनला भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्कशी जोडले जाईल, हा भूमिगत मार्ग अँनी बेझंट मार्गाने पुढे हाजीआलीपर्यंत जाऊन पार्किंगला जोडला जाईल, तिथून तो कोस्टल रोडशी जोडला जाईल, असे आयुक्त गगराणी म्हणाले. कोस्टल रोड आणि सेंट्रल पार्क भूमिगत मार्गाने जोडल्याने सेंट्रल पार्क आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये येणाऱ्या गर्दीचे नियोजन करता येईल. कोस्टल रोड पार्किंगमध्ये १२०० गाड़्या, १०० बसेस पार्क करण्याची क्षमता आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या प्रकल्पामुळे ३०० एकरचे ऑक्सिजन पार्क तयार होणार असल्यानं मुंबईतील हवेचं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. मे महिन्यापर्यंत मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे क्राँक्रिटीकरण पूर्ण होईल. ६ डिसेंबर २०२६ पर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण होतील. महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण केल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ठाणेकरांना मिळणार आंतरराष्ट्रीय दर्जाचं ॲम्युझमेंट पार्क

ठाणे खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर २६० मीटर उंचीचा आहे. फ्रान्समधील आयफेल टॉवर ३०० मीटर उंच आहे. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे २५ एकरमध्ये टाऊन पार्क, आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर व ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारलं जाईल. त्याचबरोबर ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून १८.४ कि.मी लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाणार आहे. यामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना अत्याधुनिक दर्जाच्या सेवासुविधा उपलब्ध होणार आहेत, तसेच ठाणेकरांचे जीवनमान उंचावणार असून ठाण्याचा विकासाचा वेग वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. यातील बहुतेक प्रकल्पांची टेंडर प्रक्रिया सुरु झाली असून हे सर्व प्रकल्प बीओटी तत्वावर विकसित केले जातील, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 

पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  • आजवर फक्त श्रीमंतांसाठी असलेले महालक्ष्मी रेसकोर्स आता सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुलं होणार आहे.
  • हे ३०० एकरावरील अंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पार्क मुंबईसाठी ऑक्सीजन पार्क ठरेल.
  • या सेंट्रल पार्कचा संपूर्ण आराखडा तयार झाला आहे. हाफिज कॉन्ट्रैक्टर यांनी अत्यंत सुरेख असा आराखडा तयार केला आहे.
  • या सेंट्रल पार्कची निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले आहेत.
  • रेसकोर्स आणि त्याच्या ऐतिहासिक वारशाला कुठेही धक्का लागणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.
  • १२० एकरवर तीन इंटर कनेक्टेड झोन्स तयार केले जाणार असून प्रत्येक झोन्स भूमिगत मार्गांनी जोडले जाणार आहेत. यामुळे विनाअडथळा वाहतूक सुरु राहील.


मुंबईतील सेंट्रल पार्कची वैशिष्टये

  1. १२ एकर जागेवर सिटी फॉरेस्ट विकसित केले जाईल. यामुळे मुंबईला भरपूर ऑक्सीजन देत प्रदूषण कमी करण्यास मदत करेल.
  2. ७७ एकरवर गार्डन आणि ओपन कॉन्सर्टसाठी मैदान राखीव असेल. 
  3. ३१ एकरवर बॉटनिकल गार्डन, इनडोअर कॉन्सर्ट अरेना आणि कॉन्व्हेंशन सेंटर असेल.  
  4. हिरवेगार बॉटनिकल लॅंडस्केप आणि वर्ल्ड क्लास इंडोअर अरेना असेल.


मल्टी स्पोर्ट अरेना (Multi-Sport Arena)

सेंट्रल गार्डन खाली वर्ल्ड क्लास मल्टी स्पोर्ट अरेना त्यात अक्वाटिक अरेना, आंतरराष्ट्रीय दर्जाची बॉक्सिंग रिंग, खो-खो, स्केटींग, जिमॅस्टिक, बास्केटबॉल असे अनेक क्रीडा प्रकारांसाठी मैदाने आणि प्रशिक्षणाची सुविधा असेल. मुंबईच्या तरुण खेळाडूंसाठी आणि क्रीडा प्रेमींसाठी एक अद्ययावत क्रीडा परिसंस्था त्यामुळे तयार होईल.

विविध प्रकारची पार्क ठाण्याच्या सौंदर्यात भर घालणार

  • ठाणे खाडी किनारी ५० एकरात भारतातील सर्वांत उंच व्हिविंग टॉवर उभारला जाणार आहे. हा टॉवर २६० मीटर उंचीचा आहे.
  • कासारवडवली येथे कन्व्हेन्शन सेंटर, कोलशेत येथे २५ एकरमध्ये टाऊन पार्क उभारले जाणार आहे.
  • आगरी कोळी संग्रहालय, मत्स्यालय, विज्ञान केंद्र, आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्नो पार्क, ॲम्युझमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क देखील विकसित होणार आहे.
  • ठाण्यात १२.५ एकरमध्ये पक्षी संग्रहालय, २५ एकरमध्ये म्युझिकल कॉन्सर्ट सेंटर व ५० एकरमध्ये अत्याधुनिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले जाणार आहे.
  • ठाणे महापालिकेकडून मीरा भाईंदर महापालिकेच्या सीमेलगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाशी जोडून १८.४ कि.मी लांबीचा आनंदवन हरित पट्टा विकसित केला जाणार आहे.

Web Title : महालक्ष्मी रेसकोर्स में बनेगा सेंट्रल पार्क; मुख्यमंत्री को योजना प्रस्तुत।

Web Summary : मुंबई का महालक्ष्मी रेसकोर्स विश्व स्तरीय सेंट्रल पार्क में बदलेगा। 295 एकड़ के पार्क में स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होगा, जो कोस्टल रोड से जुड़ेगा और रेसकोर्स की विरासत को संरक्षित करेगा। ठाणे में भी एक मनोरंजन पार्क बनेगा।

Web Title : Mahalaxmi Racecourse to get Central Park; Plan presented to CM.

Web Summary : Mumbai's Mahalaxmi Racecourse will transform into a world-class Central Park. The 295-acre park includes a sports complex, connects to the Coastal Road and preserves the racecourse's heritage. Thane will also get an amusement park.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.