भरधाव टेम्पोच्या धडकेत घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 09:57 IST2025-08-25T09:56:17+5:302025-08-25T09:57:05+5:30

Accident News: घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.  

A little girl playing outside died after being hit by a speeding tempo. | भरधाव टेम्पोच्या धडकेत घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

भरधाव टेम्पोच्या धडकेत घराबाहेर खेळणाऱ्या चिमुरडीचा मृत्यू

मुंबई - घराबाहेर खेळत असलेल्या नूर फातिमा खान या चार वर्षांच्या चिमुरडीला भरधाव टेम्पोने धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.  नूर फातिमा ही नारायण नगर येथील घराबाहेर खेळत होती. यावेळी भरधाव टेम्पोने तिला धडक दिली. यामध्ये ती जखमी झाली. तिची आई हसीना हिने तिला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

Web Title: A little girl playing outside died after being hit by a speeding tempo.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.