तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 07:15 IST2025-10-28T07:15:25+5:302025-10-28T07:15:36+5:30
याप्रकरणी बँकेचे उप-सरव्यवस्थापक पी. सर्वानन यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली होती

तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
मुंबई : ऑप्टिकल फायबरच्या व्यवसायात असलेल्या कुर्ल्यातील एका कंपनीने कॅनरा बँकेला ११ कोटी ३७ लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सीबीआयने मुंबईत कंपनीतील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. याप्रकरणी बँकेचे उप-सरव्यवस्थापक पी. सर्वानन यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची पडताळणी करत सीबीआयने या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ऑप्टिकल फायबरचे जाळे पसरण्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीला कॅनेरा बँकेने ११ कोटी ७१ लाख रुपयांचे कर्ज दिले होते. २०२२ ते २०२४ या कालावधीत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या कर्जप्राप्त रकमेचा वापर ज्या कारणांसाठी कर्ज देण्यात आले होते, त्यासाठी केला नाही. त्यांनी ही रक्कम अन्यत्र वळवली होती. तसेच कंपनीला तोटा झाल्याची बनावट कागदपत्र सादर केली होती. त्यानंतर एप्रिल २०२३मध्ये कंपनीचे खाते थकीत कर्ज खाते म्हणून जाहीर करण्यात आले आहे.