गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 06:54 IST2023-10-17T06:54:43+5:302023-10-17T06:54:49+5:30

राज्य सरकारच्या निर्देशाने आठ सदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते.

A bundle of rags caused the Goregaon fire | गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत

गोरेगावच्या आगीला चिंध्यांची गाठोडी कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पार्किंगमधील चिंध्यांची गाठोडी आणि अपरात्री कोणीतरी येऊन टाकलेले सिगारेटचे जळते थोटूक यामुळे गोरेगाव येथील जय भवानी इमारतीला आग लागल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढल्याचे कळते. 

भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सातमजली इमारतींनाही अग्निसुरक्षा यंत्रणा बंधनकारक करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आल्याचे समजते. राज्य सरकारच्या निर्देशाने आठ सदस्यीय समिती नियुक्त झाली आहे. या समितीला सात दिवसांत अहवाल देण्यास सांगितले होते.

समितीची सोमवारी बैठक झाली. त्यात महत्त्वपूर्ण चर्चा झाली, पण अंतिम अहवाल मंगळवारी आयुक्तांना सादर होणार आहे. दरम्यान जय भवानी इमारतीला लागलेल्या आगीत जखमी झालेले सुनील ढेंबरे (४८) यांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या आता ८ झाली आहे.  

Web Title: A bundle of rags caused the Goregaon fire

टॅग्स :fireआग