टोरेस घोटाळ्याप्रकरणी तब्बल २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 07:12 IST2025-03-18T07:12:24+5:302025-03-18T07:12:51+5:30
फसवणुकीचा आकडा १४२.५८ कोटींवर गेला असून, अजूनही तक्रार अर्ज येत आहे...

टोरेस घोटाळ्याप्रकरणी तब्बल २७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल
मुंबई : टोरेस प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडसह आठ जणांविरुद्ध २७ हजार १४२ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. फसवणुकीचा आकडा १४२.५८ कोटींवर गेला असून, अजूनही तक्रार अर्ज येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड, तानिया ऊर्फ ताझगुल एक्सतोव्हा, व्हॅलेंटिना कुमार, सर्वेश सुर्वे, अल्पेश खारा, तोसिफ रियाज, आर्मेन अटिअँन, लल्लान सिंग यांच्या विरुद्ध हे दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात आतापर्यंत १४ हजार १५७ गुंतवणूकदार पुढे आले असून, तक्रार अर्ज येणे सुरू आहे. त्यांच्या जबाबाचा यामध्ये समावेश आहे. यातील पसार आरोपींचाही शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे प्रयत्न सुरू आहेत.