Join us

मुंबईत २५ वर्षीय तरुणीने २२व्या मजल्यावरून मारली उडी, खाली पडताच शरीराचे झाले दोन तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:01 IST

Mumbai Crime news: विक्रोळीमध्ये एका २५ वर्षीय तरुणीने बहुमजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता.

Mumbai Crime: मुंबई पूर्व उपनगरात एक भयंकर घटना घडली. सोमवारी (२६ मे) मुसळधार पाऊस सुरू असतानाच एका तरुणीने २२व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २५ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यु झाला. २२व्या मजल्यावरून उडी मारल्यानंतर तरुणीच्या शरीराचे खाली पडताच दोन तुकडे झाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

विक्रोळीतील कन्नमवारनगरमध्ये सोमवारी (२६ मे) रात्री  ही घटना घडली आहे. हर्षदा तांदोलकर असे मयत तरुणीचे नाव आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. पण, या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 

छिन्नविछिन्न अवस्थेत पडला होता हर्षदाचा मृतदेह 

२५ वर्षीय हर्षदाने २२व्या मजल्यावरील टेरेसावरून खाली उडी मारली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याप्रमाणे घटनास्थळावरील दृश्य थरकाप उडवणारे होते. 

वाचा >>बागेश्वर धामला कथा ऐकली, एकाच कुटुंबातील ७ जणांनी घरी येताना उचललं टोकाचं पाऊल

कन्नमवार नगरमधील इमारत क्रमांक ९७ मध्ये ही घटना घडली. इतक्या उंचीवरून उडी मारून आत्महत्या केल्यामुळे खाली पडल्यानंतर तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. रक्ताचा सडा पडला होता. तिचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला होता. 

पोलिसांनी घटनास्थळी घेतली धाव

परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून, हर्षदा तांदोलकरने आत्महत्या का केली असावी, याचा शोध पोलीस घेत आहे. 

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हर्षदा तांदोलकर तणावाखाली होती. पण, तिने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप कळालेले नाही. हर्षदा उडी मारली. त्यानंतर ती खाली उभ्या करण्यात आलेल्या दुचाकीवर कोसळली. त्यामुळे तिच्या मृतदेहाचे दोन तुकडे झाले. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई पोलीसमृत्यूमहिला