राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे ९८ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 06:05 AM2019-04-16T06:05:22+5:302019-04-16T06:05:37+5:30

दिवसा उन्हाचा तडाखा आणि दोन दिवसांपासून ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे.

 98 victims of swine flu in the state in three months | राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे ९८ बळी

राज्यात तीन महिन्यांत स्वाइन फ्लूचे ९८ बळी

googlenewsNext

मुंबई : दिवसा उन्हाचा तडाखा आणि दोन दिवसांपासून ढगाळ, पावसाळी वातावरणामुळे विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून येत आहे. सर्दी, ताप, खोकला, डेंग्यूसह स्वाइन फ्लूच्या तापाचाही संसर्ग वाढला आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात स्वाइन फ्लूमुळे ९८ रुग्णांचे बळी गेले आहेत. शिवाय या रुग्णांची संख्या १, २५० वर येऊन ठेपली आहे.
राज्यात नाशिकच्या खालोखाल नागपूर, अहमदनगरमध्ये स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू झाले. तर राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये २४७ रुग्ण दाखल आहेत. राज्यात जानेवारी ते एप्रिल या कालावधीत तब्बल स्वाईन फ्लूचे ९४ बळी गेले असून १० एप्रिलपर्यंत १,२३६ रुग्ण आढळले.

Web Title:  98 victims of swine flu in the state in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.