बेस्ट अपघातात पाच वर्षांत ८८ लोकांनी गमावला जीवमाहिती अधिकारातून समोर; प्रशासनाकडून ४२ कोटींची भरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 10:17 IST2025-01-14T10:15:40+5:302025-01-14T10:17:05+5:30

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे.

88 people lost their lives in BEST accidents in five years, RTI reveals; Administration compensates Rs 42 crore | बेस्ट अपघातात पाच वर्षांत ८८ लोकांनी गमावला जीवमाहिती अधिकारातून समोर; प्रशासनाकडून ४२ कोटींची भरपाई

बेस्ट अपघातात पाच वर्षांत ८८ लोकांनी गमावला जीवमाहिती अधिकारातून समोर; प्रशासनाकडून ४२ कोटींची भरपाई

मुंबई :  मागील पाच वर्षांत बेस्ट बसचे ८३४ अपघात झाले असून, यात ८८ लोकांना जीव गमवावा लागल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये प्राण गमावलेल्यांच्या नातेवाइकांना तसेच जखमींना आतापर्यंत ४२.४० कोटींची भरपाई उपक्रमाकडून देण्यात आली आहे.  मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये विविध कारणांनी शेकडो प्रवाशांना प्राण गमवावे लागतात, तर काही जखमींना कायमचे अपंगत्व येते. अशीच काहीशी परिस्थिती बेस्ट उपक्रमातही आहे.

बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या दैनंदिन प्रवासी संख्या ३५ लाखांपुढे गेली आहे. मात्र, आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाकडे त्यासाठी आवश्यक बसचा ताफा नाही. त्यामुळे कंत्राटी बस आणि त्यावर असणाऱ्या चालकांकडून बेजबाबदारपणे बस चालविल्या जात असल्याचा अनुभव अनेक प्रवाशांना येत आहे. चालकाकडून बेस्ट बस वेगाने चालविणे, ओव्हरटेक करणे यामुळे अपघातांना सामोरे जावे लागते. यात अन्य वाहन चालक, प्रवासी किंवा पादचाऱ्यांचाही अपघात होतो.

गेल्या पाच वर्षांत बेस्ट बसचे ८३४ अपघात झाले आहेत. या अपघातांसाठी जबाबदार असलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बडतर्फ तसेच २४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे, अशी माहिती प्रशासनाकडून माहिती अधिकाराच्या उत्तरात देण्यात आली आहे.

असे घडले अपघात 
मागील पाच वर्षांत एकूण ८३४ बस अपघात झाले असून, यात बेस्टच्या स्वमालकीच्या बसकडून ३५२ अपघात घडले असून, यात जीव गेलेल्यांची संख्या ५१ आहे. तर भाडे तत्त्वावरील बसचे ४८२ अपघात घडले असून, त्यात ३७ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

बेस्टच्या खासगी असोत किंवा स्वमालकीच्या बस असोत यातील मागच्या ५ वर्षांतील अपघातांची संख्या धक्कादायक आहे. बेस्ट उपक्रम सामान्यांसाठी किती सुरक्षित आहे याची आणि उपक्रमाने काय खबरदारी घ्यायला हवी याची कल्पना यावरून येते. 
- अनिल गलगली, 
माहिती अधिकार कार्यकर्ते

Web Title: 88 people lost their lives in BEST accidents in five years, RTI reveals; Administration compensates Rs 42 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BESTबेस्ट