हेपॅटायटीस रुग्‍णसंख्‍येत ८३.६०% घट, तर गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या संख्‍येत ६८ % घट     

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 05:26 PM2020-11-28T17:26:25+5:302020-11-28T17:26:51+5:30

Patients reduction the number : जनजागृतीचा सकारात्‍मक परिणाम

83.60% reduction in the number of hepatitis patients and 68% reduction in the number of gastro patients | हेपॅटायटीस रुग्‍णसंख्‍येत ८३.६०% घट, तर गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या संख्‍येत ६८ % घट     

हेपॅटायटीस रुग्‍णसंख्‍येत ८३.६०% घट, तर गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या संख्‍येत ६८ % घट     

googlenewsNext

मुंबई : यंदा बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातील जलजन्‍य आजारांच्‍या रुग्‍णसंख्‍येत आकडेवारीनुसार लक्षणीय घट झाली आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर या ११ महिन्‍यांच्‍या कालावधीचा तुलनात्‍मक अभ्‍यास केला असता वर्ष २०१९ च्‍या तुलनेत वर्ष २०२० मध्‍ये जलजन्‍य आजार असणा-या हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ८३.६० टक्‍क्‍यांची, तर गॅस्‍ट्रो बाधितांच्‍या संख्‍येत ६८.०४ टक्‍क्‍यांची नोंदविण्‍यात आली आहे, अशी माहिती बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

अव्‍याहतपणे पिण्‍याचे शुध्‍द पाणी पुरविण्‍यात देशात सातत्‍याने अग्रक्रम राखणारी बृहन्‍मुंबई महानगरपालिका, आपल्‍या क्षेत्रातील जलजन्‍य आजारांचे प्रमाण कमीतकमी व्‍हावे, यासाठी देखील नियमितपणे प्रयत्‍न करित असते. यामध्‍ये प्रामुख्‍याने पुरविण्‍यात येणा-या पाण्‍याची गुणवत्‍ता राखण्‍यासोबतच सातत्‍याने करण्‍यात येणा-या जनजागृतीचाही समावेश असतो. बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जलजन्‍य आजारांच्‍या गेल्‍या ६ वर्षातील आकडेवारीचा अभ्‍यास केल्‍यास महापालिका क्षेत्रातील जलजन्‍य आजरांचे प्रमाण हे उत्‍तरोत्‍तर कमी होत असल्‍याचेही आढळून येत आहे. त्‍याचबरोबर ‘कोविड – १९’ च्‍या पार्श्‍वभूमीवर बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंध विषयक जनजागृती देखील अत्‍यंत प्रभावीप्रणे प्रभावीपणे करण्‍यात आली. यानुसार दोन्‍हीस्‍तरावर करण्‍यात आलेल्‍या जाणीव जागृती कार्यक्रमांना नागरिकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत सहकार्य केले. या अधिकाधिक परिपूर्ण सहकार्याचे सकारात्‍मक प्रतिबिंब नुकत्‍याच उपलब्‍ध झालेल्‍या आकडेवारीतही दिसून येत आहे.

बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात जलजन्‍य आजारांबाबत दरवर्षी सातत्‍यपूर्ण जनजागृती केली जाते. याच जोडीला यंदा कोविड प्रतिबंधाबाबत देखील प्रभावी जाणीव जागृती नियमितपणे करण्‍यात येत आहे. याअंतर्गत प्रामुख्‍याने सातत्‍याने हात धुणे, उघडयावरचे अन्‍न न खाणे, कटाक्षाने शुध्‍द पाणी पिणे आदीबाबींचा समावेश आहे. या जनजागृती प्रयत्‍नांना नागरिकांनी देखील अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. त्‍यामुळेच गेल्‍यावर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१९ या दरम्‍यान १ हजार ४९४ एवढी असणारी हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या यंदा म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधी दरम्‍यान २४५ इतकी झाली आहे. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत हेपॅटायटीस रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ८३.६० टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे. हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१५ या दरम्‍यान १ हजार ७५ एवढी होती. याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी सदर रुगणसख्‍ंया सन २०१६ मध्‍ये १ हजार ४२५, वर्ष २०१७ मध्‍ये १ हजार १०५, सन २०१८ मध्‍ये १ हजार ७४ एवढी नोंदविण्‍यात आली होती.

जलजन्‍य आजार असणा-या गॅस्‍ट्रो रुग्‍णांच्‍या सख्‍ंयेत देखील गेल्‍या वर्षीच्‍या तुलनेत लक्षणीय घट नोंदविण्‍यात आली आहे. जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१९ या ११ महिन्‍यांच्‍या कालावधी दरम्‍यान ७ हजार २४७ रुग्‍ण आढळून आले होते. तर जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० या दरम्‍यान २ हजार ३१६ रुग्‍ण आढळून आले. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍येत तब्‍बल ६८.०४ टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे. गॅस्‍ट्रो रुग्‍णसंख्‍या ही जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१५ या दरम्‍यान १० हजार २५७ एवढी होती. याच ११ महिन्‍यांच्‍या कालावधीसाठी सदर रुगणसख्‍ंया सन २०१६ मध्‍ये ९ हजार ४६२, वर्ष २०१७ मध्‍ये ७ हजार ९११, सन २०१८ मध्‍ये ७ हजार ३१५ एवढी नोंदविण्‍यात आली होती.

हेपॅटायटीस ‘ए’ व ‘ई’ आणि गॅस्‍ट्रो या दोन्‍ही जलजन्‍य आजारांच्‍या उपलब्‍ध आकडेवारीचा एकत्रित विचार करावयाचा झाल्‍यास जानेवारी ते नोव्‍हेंबर २०१९ दरम्‍यान ८ हजार ७४१ रुग्‍ण आढळून आले होते. तर याच कालावधीसाठी यंदाच्‍या वर्षी म्‍हणजेच जानेवारी ते नोव्‍हेंबर २०२० दरम्‍यान २ हजार ५६१ रुग्‍ण आढळून आले आहेत. याचाच अर्थ गेल्‍यावर्षीच्‍या तुलनेत जलजन्‍य आजारांच्‍या रुग्‍णसख्‍ंयेत ७०.७० टक्‍क्‍यांची घट नोंदविण्‍यात आली आहे.

Web Title: 83.60% reduction in the number of hepatitis patients and 68% reduction in the number of gastro patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.