मेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 07:13 PM2019-10-15T19:13:23+5:302019-10-15T19:24:57+5:30

स्थलांतरित करण्यात आलेल्या अनेक झाडांची अवस्था बिकट

800 of 1800 trees transplanted by Mumbai Metro from aarey forest are dead | मेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत

मेट्रोसाठी आरेतून स्थलांतरित केलेली 1800 पैकी 800 झाडं मृतावस्थेत

googlenewsNext

मुंबई: मेट्रोच्याआरेतील प्रस्तावित कारशेडसाठी रात्री करण्यात आलेल्या झाडांच्या कत्तलीवरुन सरकार आणि मेट्रो प्रशासनावर जोरदार टीका झाली होती. यानंतर आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमआरसीएल) स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांबद्दलची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरेमधील 1800 झाडांचं स्थलांतरित केल्याचा दावा एमएमआरसीएलनं केला होता. मात्र यापैकी तब्बल 800 झाडं मृतावस्थेत असल्याचं भीषण वास्तव समोर आलं आहे. 

प्रस्तावित कारशेडच्या जागेवरील 1800 झाडं स्थलांतरित केल्याचा एमएमआरसीएलचा दावा आहे. मुंबईतील विविध ठिकाणांसह आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात झाडांचं स्थलांतर केल्याची माहिती एमएमआरसीएलनं दिली होती. मात्र यापैकी 800 झाडं मृतावस्थेत असल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'नं दिलं आहे. झाडांचं स्थलांतर करताना आणि स्थलांतर पूर्ण झाल्यावर त्यांची योग्य काळजी घेण्यात येईल, असं एमएमआरसीएलकडून सांगण्यात आलं होतं. मात्र तसं काहीच घडलं नसल्याचं झाडांच्या अवस्थेवरुन दिसत आहे.



आरेतील प्रस्तावित कारशेडच्या जागेवरुन आरे कॉलनीमध्येच स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. यावेळी स्थलांतरित करण्यात आलेल्या झाडांवर एक लॅमिनेशन करण्यात आलेला कागद दिसला. त्यावर झाडाचा क्रमांक आणि ते कुठून स्थलांतरित करण्यात आलं याचा तपशील होता. लॅमिनेशन करण्यात आलेला कागद लावण्यात आलेली काही झाडं चांगल्या स्थितीत आहेत. मात्र बहुतांश झाडं मृतावस्थेत आहेत. 

स्थलांतरित करण्यात आलेली काही झाडं सुकून गेली आहेत. तर काही झाडांच्या फांद्यांवर एकही पान शिल्लक राहिलेलं नाही. अनेक झाडं तर मृतावस्थेत आहेत. फक्त आरेच नव्हे, तर मुंबईतील इतरत्र भागांमध्ये स्थलांतरित केलेल्या झाडांची अवस्थादेखील अशीच आहे. त्यामुळे आरेतील झाडांचं स्थलांतर करुन एमएमआरसीएलनं त्यांची हत्या केल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे. 
 

Web Title: 800 of 1800 trees transplanted by Mumbai Metro from aarey forest are dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.