मुंबई : ७६ वर्षांपासून सुरू असलेला पुण्यातील मालमत्ता वाद अखेर निकाली निघाला. मूळ जमीन मालकाच्या वारसांमध्ये एक एकर जमिनीचे वाटप करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
न्या. फरहान दुबाश यांच्या एकलपीठाने दिलेल्या निकालात जमीन मालक एम. एम. एच. जानमोहम्मद यांच्या वारसांनी फेब्रुवारी १९५० मध्ये दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या. या याचिकांमध्ये मालमत्तेचे विभाजन करून आपापला हिस्सा देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायालयाने पुण्यातील येरवडा येथे उरलेल्या सुमारे एक एकर जमिनीचे वारसांमध्ये विभाजन करण्याचे आदेश दिले.
येरवड्यातील १६ एकर जमिनीचा वाद कायमप्राथमिक विभाजन जाहीर केले होते. त्यानंतर राज्य सरकारने डेक्कन कॉलेज रोडवरील प्लॉट संपादित केला आणि त्याबदल्यात मिळालेली नुकसानभरपाई कायदेशीर वारसांमध्ये वाटली.
येरवड्यातील १६ एकर जमिनीबाबतचा वाद मात्र कायम राहिला. जमीनमालकाने जिवंतपणी नियुक्त केलेल्या व्यवस्थापकाच्या वारसांसह अन्य व्यक्तींनीही जमिनीवर हक्क सांगितला.
Web Summary : The Bombay High Court resolved a 76-year-old Pune property dispute, ordering the division of a one-acre Yerwada land among the original owner's heirs. This settles a 1950 petition seeking property division, though a larger 16-acre dispute remains.
Web Summary : बॉम्बे उच्च न्यायालय ने 76 साल पुराने पुणे संपत्ति विवाद को सुलझाया, मूल मालिक के उत्तराधिकारियों के बीच एक एकड़ येरवदा भूमि के विभाजन का आदेश दिया। इससे संपत्ति विभाजन की मांग वाली 1950 की याचिका का निपटारा हो गया, हालांकि एक बड़ा 16 एकड़ का विवाद अभी भी बना हुआ है।