मेट्रो-३ मार्गिकेचे दोन वर्षांत ७० टक्के काम पूर्ण, ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 03:39 AM2019-11-26T03:39:44+5:302019-11-26T03:40:12+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) करण्यात येत असून आतापर्यंत ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

70% work of Metro-3 laning completed in two years | मेट्रो-३ मार्गिकेचे दोन वर्षांत ७० टक्के काम पूर्ण, ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे काम पूर्ण

मेट्रो-३ मार्गिकेचे दोन वर्षांत ७० टक्के काम पूर्ण, ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे काम पूर्ण

Next

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. या मार्गिकेचे भुयारीकरणाचे काम मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडमार्फत (एमएमआरसीएल) करण्यात येत असून आतापर्यंत ७० टक्के भुयारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूण ५५ किमी भुयारीकरणापैकी ३८.२५ किमीचे भुयारीकरण करण्यात आले असून मेट्रो ३ प्रकल्पाच्या पूर्णत्वाच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. हे खडतर आव्हान पूर्ण करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन, त्यांचे तांत्रिक सल्लागार आणि कंत्राटदार यांची अनेक पथके यासाठी अहोरात्र कार्यरत आहेत, असे एमएमआरसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या, हा प्रकल्प पूर्ण करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. मात्र सर्व परिस्थितीला मेट्रो ३ च्या टीमने समर्थपणे तोंड देत हे यश मिळविल्याचा सार्थ अभिमान आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय बदल दिसून येतील. यातून दररोज १७ लाख लोक रोज प्रवास करतील, ज्यामुळे रोजच्या ६.५ लाख वाहनफेऱ्या कमी होऊन प्रदूषित वायूंचे प्रमाण प्रतिवर्षी २.६१ लाख मेट्रिक टन इतके कमी होईल. ७० टक्के भुयारीकरण होणे म्हणजे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीच्या दृष्टीने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्र शासन, कंत्राटदार आणि सल्लागारांची टीम आणि मुंबईकरांचे मी मनस्वी आभार मानते, असेही त्या म्हणाल्या.

आतापर्यंतचा भुयारीकरणाचा विचार करता पॅकेज ७ (मरोळ नाका ते आरे स्थानक) आघाडीवर असून या पॅकेजमध्ये ९७ टक्के बोगदा खणून झाला आहे. १२ डिसेंबर २०१९ पर्यंत येथील शंभर टक्के काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. इतर पॅकेजमध्येदेखील भुयारीकरण प्रगतिपथावर आहे. एकूण ३८.२५ किमी भुयारीकरणासाठी २७,०३० रिंग्जचा उपयोग करण्यात आला. आतापर्यंत २३ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले असून येत्या वर्षात उर्वरित ९ टप्पे पूर्ण होणे अपेक्षित आहे, अशी माहिती एमएमआरसीएलचे प्रकल्प संचालक एस.के. गुप्ता यांनी दिली.

भुयारीकरणाच्या कामाचा तपशील पुढीलप्रमाणे
पॅकेज व मार्ग, भुयारीकरणाची टक्केवारी
पॅकेज १ (कफ परेड ते हुतात्मा चौक स्थानक) भुयारीकरण ५८%
पॅकेज २ (सीएसएमटी ते ग्रँट रोड स्थानक) भुयारीकरण ८६%
पॅकेज ३ (मुंबई सेंट्रल ते वरळी) भुयारीकरण ३८%
पॅकेज ४ (सिद्धिविनायक ते शीतलादेवी मंदिर स्थानक)
भुयारीकरण ७४%
पॅकेज ५ (धारावी ते सांताक्रुझ स्थानक) भुयारीकरण ७४ %
पॅकेज ६ (आंतरदेशीय विमानतळ ते आंतरराष्ट्रीय विमानतळ
स्थानक) ६० %
पॅकेज ७ (मरोळ नाका ते आरे स्थानक) भुयारीकरण ९७%

Web Title: 70% work of Metro-3 laning completed in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.