महाराष्ट्रात ७ लाख लोकांनी मोबाइल नंबर केला बंद, ‘ट्राय’च्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 08:08 IST2025-01-25T08:07:38+5:302025-01-25T08:08:19+5:30
Mobile Numbers Update: मोबाइल रिचार्जचे वाढलेले प्रचंड दर, नेटवर्कची समस्या यामुळे देशात नोव्हेंबरमध्ये १७ लाख ६८ हजार २४० लोकांनी मोबाइल नंबर बंद केला आहे.

महाराष्ट्रात ७ लाख लोकांनी मोबाइल नंबर केला बंद, ‘ट्राय’च्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती आली हाती
- चंद्रकांत दडस
मुंबई - मोबाइल रिचार्जचे वाढलेले प्रचंड दर, नेटवर्कची समस्या यामुळे देशात नोव्हेंबरमध्ये १७ लाख ६८ हजार २४० लोकांनी मोबाइल नंबर बंद केला आहे. मोबाइल सिमकार्ड बंद करण्याचे प्रमाण देशात सर्वाधिक महाराष्ट्रात असून, महाराष्ट्रातील ७ लाख २५ हजार ८२३ लोकांनी मोबाइल नंबर बंद केला आहे. त्यापाठोपाठ राजस्थान व गुजरातमधील ग्राहकांनी मोबाइल नंबर बंद केल्याचे ‘ट्राय’च्या आकडेवारीतून समोर आले.
१.२८ काेटी ग्राहकांनी पाेर्टेबिलिटीसाठी अर्ज केले आहेत.
ग्राहक कुठे वाढले? कर्नाटक, ओडिशा, उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, दिल्ली.
महाराष्ट्रात किती मोबाइल युजर्स?
कंपनी वापरकर्ते
जिओ ५,४७,५२,४२३
एअरटेल ३,२३,०८,२७२
व्हीआय ३,१६,७९,५१०
बीएसएनएल ५५,९७,७५०
एमटीएनएल २,१७,५४१