मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६६८२ वाहनांची झाडाझडती; रॅश ड्राईव्हिंग ८५ गुन्हे

By मनीषा म्हात्रे | Published: January 14, 2024 06:13 PM2024-01-14T18:13:50+5:302024-01-14T18:15:06+5:30

१८६९ विनाहेल्मेट वाहन चालकांसह रॅश ड्राईव्हिंगप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

6682 vehicles under special operation of Mumbai Police; Rush driving 85 offences | मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६६८२ वाहनांची झाडाझडती; रॅश ड्राईव्हिंग ८५ गुन्हे

मुंबई पोलिसांच्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६६८२ वाहनांची झाडाझडती; रॅश ड्राईव्हिंग ८५ गुन्हे

मुंबई: मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून राबविण्यात आलेल्या विशेष ऑपरेशन अंतर्गत ६ हजार ६८२ वाहनांची झाडाझडती घेण्यात आली. १८६९ विनाहेल्मेट वाहन चालकांसह रॅश ड्राईव्हिंगप्रकरणी ८५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांच्या देखरेखीखाली विशेष मोहिम राबविण्यात आली. या मोहिमे दरम्यान सर्व पोलीस ठाण्याच्या हददीत १०८ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान ६,६८२ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. 

विना हॅल्मेट (१८६९), ट्रिपल सिट (२५५)  विरुध्द दिशेने वाहन चालविणाऱ्या एकुण १३८ वाहन चालकांवर मोटार वाहन कायदयान्वये कारवाई करण्यात आली आहे.  तसेच, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्या २० मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. 

रॅश ड्राईव्हिंग करणारे १५३ वाहन ताब्यात
पश्चीम प्रादेशिक विभाग रोजी रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. वांद्रे रिक्लेमेशन, कार्टर रोड, पश्चीम द्रुतगती मार्ग, तसेच खेरवाडी जंक्शन, वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्स रोड, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड या परीसरात नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले. यावेळी एकुण ७७ गुन्हे नोंद करत १५३ वाहने ताब्यात घेण्यात आलेली आहेत. यापुढे देखील रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. 

Web Title: 6682 vehicles under special operation of Mumbai Police; Rush driving 85 offences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.