राज्यात ५५,४६९ रुग्ण, तर २९७ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:24+5:302021-04-07T04:07:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यात मंगळवारी ५५,४६९ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ...

55,469 patients and 297 deaths in the state | राज्यात ५५,४६९ रुग्ण, तर २९७ मृत्यू

राज्यात ५५,४६९ रुग्ण, तर २९७ मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात मंगळवारी ५५,४६९ कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ३१ लाख १३ हजार ३५४ झाली आहे, तर दिवसभरात २९७ मृत्यू झाले असून, हे आतापर्यंतचे सर्वाधिक दैनंदिन मृत्यू आहेत, एकूण मृतांची संख्या ५६,३३० झाली आहे.

सध्या राज्यात ४ लाख ७२ हजार २८३ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात दिवसभरात ३४,२५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर आतापर्यंत एकूण २५ लाख ८३ हजार ३३१ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.९८ टक्के झाले असून, मृत्यूदर १.८१ टक्के झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९ लाख १७ हजार ४८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.८८ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४ लाख ५५ हजार ४९८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर २२ हजार ७९७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

सर्वाधिक उपचाराधीन असलेले रुग्ण

पुणे – ८४,३०९

मुंबई -७९,३६८

नाशिक- ३१,६८८

नागपूर -५७,३७२

Web Title: 55,469 patients and 297 deaths in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.