५ आयएएसच्या झाल्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 04:42 IST2018-10-23T04:42:23+5:302018-10-23T04:42:32+5:30

राज्य सरकारने सोमवारी पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत.

5 IAS transfers | ५ आयएएसच्या झाल्या बदल्या

५ आयएएसच्या झाल्या बदल्या

मुंबई : राज्य सरकारने सोमवारी पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. दुग्धविकास आयुक्त आर.आर.जाधव हे कामगार आयुक्त असतील. कामगार आयुक्त नरेंद्र पोयाम हे जाधव यांच्या जागी दुग्ध विकास आयुक्त असतील. अन्न व नागरी पुरवठा विभाग; मंत्रालय येथील सहसचिव ए. आर. काळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील. नाशिक येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्त असलेले डी. बी. गावडे हे आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक असतील. सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव (माहिती तंत्रज्ञान) एम.जे.प्रदीप चंद्रन अमरावती विभागाचे आदिवासी विकास आयुक्त असतील.

Web Title: 5 IAS transfers

टॅग्स :Policeपोलिस