मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉपोर्रेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ इमारत बनवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी एमएमआरसीएलने ४८ मजली इमारत बनवण्यासाठी ई नोटीस जारी करून पात्रता पूर्व निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी इच्छुक विकासकांना ९ जूनपर्यंत निविदा सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. यासाठी ३९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.कुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेमध्ये गिरगाव आणि काळबादेवीतील शंभराहून अधिक वर्षे राहत असलेलल्या रहिवाशांची घरे बाधित होत असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. एमएमआरसीने या कुटूंबीयांचे गिरगाव आणि काळबादेवी परिसरातच पुनर्वसन करण्याची योजना तयार केली आहे. यानुसार काळबादेवी हाईट्स (के-३), गिरगाव हाईट्स (जी-३) आणि काळबादेवी व्यावसायिक केंद्र अशा यीन इमारती बांधण्यात येणार आहेत.
एमएमआरसीने गिरगाव हाईट्स (जी-३) इमारत उभारण्यासाठी कंत्राटदार निवडीसाठी निविदा जाहीर केल्या आहेत. या निविदा प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी एमएमआरसीच्या संकेतस्थळावर संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. २१ मे ला निविदापूर्व बैठक आयोजित करण्यात आली आहे. ४८ मजली जी-३ इमारतीमध्ये ३६९ घरे आणि १५६ दुकाने तयार होणार आहेत. काळबादेवी हाईट्स (के-३) इमारत उभारण्यासाठी यापूर्वीच कंत्राट देण्यात आले आहे.
एमएमआरसीने काळबादेवी आणि गिरगाव येथील सहा भूखंडांना एकत्र करून पुनर्वसनाची योजना बनवली आहे. यानुसार काळबादेवी येथील के-१, के-२, के-३ आणि गिरगाव येथील जी-१, जी -२ आणि जी-३ भूखंडांना जोडण्यात येणार आहे. के-१, के-३ आणि जी-३ मध्ये रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. या भूखंडांवर काळबादेवी व्यावसायिक केंद्र, काळबादेवी हाईट्स, गिरगाव हाईट्स असे पुनर्वसन होणार आहे.पुनर्वसन त्याच विभागात होणारकुलाबा- वांद्रे- सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेमध्ये गिरगाव आणि काळबादेवीतील शंभराहून अधिक वर्षे राहत असलेलल्या रहिवाशांची घरे बाधित होत असल्याने त्यांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. एमएमआरसीने तयारी केली आहे.