Join us
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेत चिमुकल्याचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 06:26 IST

नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

मुंबई : भरधाव वाहनाच्या धडकेत ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी वडाळ्यात घडली. आयुष किनवडे, असे मृत मुलाचे नाव असून याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलिस तपास करीत आहेत. भूषण गोळे, असे १९ वर्षीय कारचालकाचे नाव असून, तो विलेपार्लेचा रहिवासी आहे. तो नशेत होता का नाही, यासाठी त्याचे रक्ताचे नमुने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता वडाळा येथील आंबडेकर कॉलेज परिसरालगत भूषणचे कारवरील नियंत्रण सुटले. त्याच्या भरधाव कारच्या धडकेत परिसरात खेळत असलेल्या आयुषचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण होते. नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह केईएम रुग्णालयात नेण्यात आला आहे. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेत अधिक तपास करत आहे. किनवडे हे वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय परिसरातील पदपथालगत आई-वडील आणि भावासोबत राहत होता. त्याचे वडील लग्न मंडपाचे काम करतात.

टॅग्स :मुंबईअपघातपोलिस