प्रवाशाला लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांची हकालपट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:48 AM2019-07-24T01:48:39+5:302019-07-24T01:49:03+5:30

जमीर काझी  मुंबई : ‘ऑन ड्युटी’ एका प्रवाशाला लुबाडणाºया दोन साहाय्यक फौजदारांसह मुंबई रेल्वे पोलीस दलातीले (जीआरपी) सहा पोलिसांची ...

4 policemen arrested with robbery officers | प्रवाशाला लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांची हकालपट्टी

प्रवाशाला लुबाडणाऱ्या अधिकाऱ्यांसह ६ पोलिसांची हकालपट्टी

Next

जमीर काझी 

मुंबई : ‘ऑन ड्युटी’ एका प्रवाशाला लुबाडणाºया दोन साहाय्यक फौजदारांसह मुंबई रेल्वे पोलीस दलातीले (जीआरपी) सहा पोलिसांची खात्यातून हकालपट्टी करण्यात आली आहे. रेल्वेचे आयुक्त रवींद्र सेणगांवकर यांनी त्याबाबतचे आदेश नुकतेच जारी केले आहेत. सेवेतून एकाचवेळी इतक्या पोलिसांना थेट बडतर्फ करण्याची ‘जीआरपी’तील ही पहिलीच घटना आहे.

साहाय्यक फौजदार संजय वामन कुंभार व भरत जयंवत पठारे, हवालदार बाळकृष्ण लाडू सावंत (सध्या चर्चगेट पोलीस ठाणे), हवालदार संजय रामचंद्र जगताप (सध्या पालघर), विक्रांत विलासराव जाधव (वसई) व भीमराव आनंदराव भिंगावडे अशी बडतर्फ केलेल्यांची नावे आहेत. यापैकी बहुतांश निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत.

सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे कर्तव्यावर असताना गेल्या वर्षी १३ एप्रिलला सुभाष वर्मा नावाच्या प्रवाशाला लुबाडून दीड लाख रुपये उकळले होते. त्याने घडलेला प्रकार ई-मेलद्वारे वरिष्ठ अधिकाºयांना कळविल्यानंतर तपासाची चक्रे फिरली आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली.

प्रवाशाला लुबाडणाºया सहा जणांना खात्यातून बडतर्फ करताना त्यांनी आर्थिक लाभासाठी लुबाडल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच प्रवाशाची चौकशी केल्याबद्दल नियंत्रण कक्ष किंवा वरिष्ठ अधिकाºयांना कळविलेही नाही. हा प्रकार बेशिस्त व खात्याला काळिमा फासणारा असल्याचे त्यांच्यावरील कारवाईच्या आदेशात नमूद केले आहे.

नेमके काय घडले होते?
उपरोक्त सहाही जण सीएसएमटी रेल्वे पोलीस ठाण्यात नियुक्तीला असताना १२ एप्रिल २०१८ ला त्यांना विविध ठिकाणी नाईट ड्युटी देण्यात आली होती. मात्र ते नियोजित ठिकाणी न छच्च्थांबता १३ एप्रिलला सकाळी एकत्र आले. स्थानकाच्या मेन लाइनवरील ९ क्रमांकाच्या फलाटावर गेले. तेथे आलेल्या हुसेनसागर एक्स्प्रेसमधून उतरलेल्या प्रवाशाची झडती व बॅगा तपासू लागले. प्रवासी सुभाष वर्मा याने आपल्या बॅगा तपासण्यास नकार दिला असता त्याला घेऊन पुन्हा डब्यात गेले. सुमारे २७ मिनिटे ते डब्यात होते. त्याच्याकडून दीड लाख रुपये घेतल्यानंतर सर्व जण बाहेर पडले. प्रवासी वर्मा पुलावरून बाहेर निघून गेला. हा प्रकार घडल्यानंतर काही दिवसांनी वर्मा याने याबाबत ई-मेल करून वरिष्ठ अधिकाºयांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सर्व सहा जणांच्या विभागीय चौकशीचे आदेश उपायुक्तांनी दिले. विभागीय चौकशीत त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याने आयुक्तांनी त्यांना खात्यातून कायमस्वरूपी काढून टाकण्याचे आदेश दिले.

सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे दोषारोप
पोलिसांविरुद्धच्या चौकशीत त्यांना दिलेली ड्युटी, सीसीटीव्ही फूटेज, त्या वेळी ड्युटीवर असलेल्या साहाय्यक निरीक्षक गणपत गोंदके व साहाय्यक फौजदार दयानंद कांबळे, हवालदार यशवंत गांगोडा, उपनिरीक्षक भरत सारुक यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच फिर्यादीने स्वत: हजर न राहता घडलेला प्रकार सत्य असल्याचे सांगून संबंधितांनी रक्कम परत केल्याचा जबाब पत्राद्वारे दिला. त्यातून पुन्हा फिर्यादीवर दबाव आणल्याचा ठपका चौकशी अधिकाºयांनी संबंधितांवर ठेवला.

गृह विभागाकडे दाद मागण्याची संधी
सहा जीआरपींना खात्यातून काढण्यात आल्याने त्यांना आता थेट गृह विभागात दाद मागावी लागेल. ६० दिवसांच्या आत त्यांना त्याबाबत सचिव (अपील व सुरक्षा) यांच्याकडे याचिका दाखल करावी लागणार आहे.

Web Title: 4 policemen arrested with robbery officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस