शौचालयाची टाकी साफ करताना ३ मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 07:32 IST2019-12-24T07:32:03+5:302019-12-24T07:32:23+5:30

मुंबईच्या रहेजा संकुलाजवळील दुर्घटना

4 laborers die while cleaning toilet tank | शौचालयाची टाकी साफ करताना ३ मजुरांचा मृत्यू

शौचालयाची टाकी साफ करताना ३ मजुरांचा मृत्यू

मुंबई : शौचालयाची टाकी साफ करताना गुदमरून तीन मजुरांचा सोमवारी मृत्यू झाला. गोवंडी येथील रहेजा संकुलाजवळील गणेशवाडी येथे मोरया इमारतीशेजारी दुपारी पाऊणच्या सुमारास ही दुर्घटना घडली. विश्वजीत खगेंद्र देवनाथ (३२), गोविंद संग्राम चोरिटिया (३४) आणि संतोष प्रभाकर कळसेकर (४५) अशी मृत मजुरांची नावे आहेत.

एका इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना आत उतरलेले हे मजूर गुदमरल्याने त्यांना बाहेर येता आले नाही. स्थानिकांच्या हे लक्षात येताच त्यांना बाहेर काढून तात्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ते महापालिकेचे कर्मचारी नसून, नाका कामगार आहेत.

मे २०१९ मध्ये नालासोपारा (ठाणे) येथेही तीन मजुरांचा शौचालयाच्या टाकीत गुदमरून मृत्यू झाला होता, तर ठाण्यातील ढाकोली येथे तीन कामगार गुदमरून मृत्युमुखी पडले होते. १७ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकारला याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: 4 laborers die while cleaning toilet tank