एसटीचा कारवाईचा बडगा! 376 कर्मचारी निलंबित; खासगी वाहनांना परवानगीचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:08 AM2021-11-10T07:08:50+5:302021-11-10T07:12:12+5:30

२५० पैकी २४७ आगार बंद

376 ST Bus employees suspended; Protest against permission for private vehicles, 247 depots closed | एसटीचा कारवाईचा बडगा! 376 कर्मचारी निलंबित; खासगी वाहनांना परवानगीचा निषेध

एसटीचा कारवाईचा बडगा! 376 कर्मचारी निलंबित; खासगी वाहनांना परवानगीचा निषेध

Next

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी)  राज्य शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने समिती नेमण्याबाबत अधिसूचना  काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही. अखेर मंगळवारी  एसटी महामंडळाने कारवाईचा बडगा उगारत राज्यभरातील ४५ आगारांतील ३७६ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे.

दरम्यान, खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा संपकरी कर्मचाऱ्यांनी विविध ठिकाणी मुंडण करीत निषेध केला.राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासीवर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे.

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे एसटीच्या राज्यभरातील २५० आगारांपैकी २४७ हून अधिक आगारांमधील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. न्यायालयानेही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेऊन कामावर हजर होण्याचे निर्देश दिले होते. 

आंदोलन चुकीचे; उच्च न्यायालयाचा ठपका 

औद्योगिक न्यायालयाने आणि उच्च न्यायालयानेही कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चुकीचे असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलक कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता राज्य शासनाने प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी दिली आहे.

वारंवार बजावूनही व कर्मचाऱ्यांच्या मागण्या विचाराधीन असतानाही संप मागे न घेतल्याने उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप पुकारण्यास उद्युक्त करणाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची मुभा सोमवारी दिली. त्यानुसार, एसटी महामंडळ बुधवारी अवमान याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.यामध्ये ८० हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांचा आणि संपाची हाक देणाऱ्या संघटनेच्या अध्यक्षांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याआधीही उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास वारंवार बजावले. मात्र, अडेलतट्टू भूमिका घेत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला.

२५० पैकी सुरू असलेले तीन आगार 

कोल्हापूर : गारगोटी, कागल (अंशतः सुरू), नाशिक : इगतपुरी

आगारनिहाय निलंबित कर्मचारी संख्या

  • १ नाशिक - कळवण- १७
  • २ वर्धा - वर्धा, हिंगणघाट - ४०
  • ३ गडचिरोली - अहेरी, ब्रह्मपुरी, गडचिरोली - १४
  • ४ लातूर - औसा, उदगीर, निलंगा, अहमदपूर, लातूर - ३१
  • ६ नांदेड - किनवट, भोकर, माहूर, कंधार, नांदेड, हादगाव, मुखेड, बिलोली, देगलूर - ५८
  • ७ भंडारा- तुमसर, तिरोडा, 
  • गोंदिया - ३०
  • ८ सोलापूर - अक्कलकोट- २
  • ९ यवतमाळ -पांढरकवडा, राळेगण, यवतमाळ - ५७
  • १० औरंगाबाद -  ५
  • ११ परभणी - हिंगोली, गंगाखेड- १०
  • १२ जालना -आफ्रबाद, अंबड - १६
  • १३ नागपूर - गणेशपेठ, घाटरोड, इमाम वाडा, वर्धमाननगर - १८
  • १४ जळगाव- अमळनेर- ४
  • १५ धुळे -धुळे - २
  • १६ सांगली - जत, पलूस, इस्लामपूर, आटपाडी

एकूण : ३७६

Web Title: 376 ST Bus employees suspended; Protest against permission for private vehicles, 247 depots closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.