दंड वसुलीतून रेल्वेला ३०० कोटींचा गल्ला; मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर बडगा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 11:11 AM2024-04-08T11:11:32+5:302024-04-08T11:13:12+5:30

विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल केला जात आहे.

300 crore to railways from fine collection central railway crackdown on ticketless passengers | दंड वसुलीतून रेल्वेला ३०० कोटींचा गल्ला; मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर बडगा

दंड वसुलीतून रेल्वेला ३०० कोटींचा गल्ला; मध्य रेल्वेचा विनातिकीट प्रवाशांवर बडगा

मुंबई : विनातिकीट प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल केला जात आहे. एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान मध्य रेल्वेने विनातिकीट तसेच अनियमित प्रवास आणि बुक न केलेल्या साहित्याच्या ४६.२६ लाख प्रकरणांमधून ३०० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 

मध्य रेल्वेकडे दोन महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक असून, २२ तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी तिकीट तपासणीच्या उत्पन्नात वैयक्तिकरीत्या एक कोटी रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले आहे.

‘या’ निरीक्षक - परीक्षकांनी केली विक्रमी दंडवसुली -

१) सुनील नैनानी, ट्रॅव्हल तिकीट निरीक्षक, मुंबई - २०,११७ प्रकरणांमधून १.९२ कोटी 

२) एम.एम. शिंदे, मुख्य तिकीट निरीक्षक, मुंबई - १८,२२३ प्रकरणांमधून १.५९ कोटी 

३) धर्मेंद्र कुमार, प्रवास तिकीट निरीक्षक, मुंबई - १७,६४१ प्रकरणांमधून १.५२ कोटी 

४) रूपाली माळवे, महिला वरिष्ठ तिकीट परीक्षक, पुणे - १५,०१५ प्रकरणांमधून १.३१ 

५) मनीषा छकने, महिला मुख्य तिकीट परीक्षक, पुणे - १३,००४ प्रकरणांमधून १.२१ 

Web Title: 300 crore to railways from fine collection central railway crackdown on ticketless passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.