राज्यात दिवसभरात ३ हजार २७७ रुग्णांची नोंद; मृत्युदर सध्या २.६३ टक्क्यांवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2020 07:02 IST2020-11-10T01:41:12+5:302020-11-10T07:02:36+5:30
कोरोनाबाधितांचे एकूण मृत्यू ४५ हजार ३२५ वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात ३ हजार २७७ रुग्णांची नोंद; मृत्युदर सध्या २.६३ टक्क्यांवर
मुंबई : राज्यात दिवसभरात ३ हजार २७७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख २३ हजार १३५ झाली आहे, तर कोरोनाबाधितांचे एकूण मृत्यू ४५ हजार ३२५ वर पोहोचला आहे.
सध्या राज्यात १० लाख ३८ हजार ५०० व्यक्ती घरगुती अलगीकऱणात असून, ७ हजार ५८६ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४ लाख ८२ हजार ९४० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.९७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील मृत्युदर सध्या २.६३ टक्के आहे. राज्यात २० मृत्यूंची नोंद झालेली असून, हे मृत्यू मुंबई महापालिका प्रशासनाने कळविलेले आहेत. दिवसभरात मृत्यू रिकाॅन्सिलिएॲक्शन प्रक्रियेत पूर्वीचे ६५ मृत्यू सोमवारी राज्याच्या प्रगतीपर मृत्यूमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने राज्याच्या एकूण मृत्यूंच्या संख्येत ६५ने वाढ झाली आहे.