दुबई, अबुधाबी, हाँगकाँगहून परतलेल्या कांदिवलीच्या तीन कुटुंबांची शहरभर भटकंती; नागरिक चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 13:01 IST2020-03-21T12:59:16+5:302020-03-21T13:01:39+5:30
मात्र परदेशवारी करून आलेल्या नागरिकांनी किमान 14 दिवस तरी घराबाहेर पडू नका, असे शासनाचे आदेश असताना येथील सदर कुटुंब मात्र सर्वत्र फिरत असल्याने परिसरातील नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याची भीती अशोकनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.

दुबई, अबुधाबी, हाँगकाँगहून परतलेल्या कांदिवलीच्या तीन कुटुंबांची शहरभर भटकंती; नागरिक चिंतेत
मुंबई- कांदिवलीची परदेशवारी करून आलेली 3 कुटुंब कांदिवली पूर्व,अशोकनगर या भागात सर्रास फिरत असून, पालिकेचे दुर्लक्ष झाल्याचे ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. कांदिवली (पूर्व) अशोकनगर येथील कदमगिरी सोसायटीमधील 3 कुटुंब दुबई, आबुधाबी दुबई
हॉंगकॉंग येथून गेल्या शुक्रवारी येथे परत आले. मात्र परदेशवारी करून आलेल्या नागरिकांनी किमान 14 दिवस तरी घराबाहेर पडू नका, असे शासनाचे आदेश असताना येथील सदर कुटुंब मात्र सर्वत्र फिरत असल्याने परिसरातील नागरिकांना कोरोनाचा धोका असल्याची भीती अशोकनगर परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.
या सोसायटीच्या अ, ब आणि क या तीन विंगला राहत असलेले तीन कुटुंबातील सदस्य सर्रास बाहेर फिरत आहेत. विशेष म्हणजे या अशोकनगर परिसरात ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात राहात असून, त्यांना देखील या तीन कुटुंबांपासून कोरोनाची लागण होण्याची भीती येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली.
यासंदर्भात आर दक्षिण वॉर्डचे साहाय्यक पालिका आयुक्त संजय कुऱ्हाडे यांच्याशी संपर्क साधला असता,आपण आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाठवून चौकशी करतो. तर समतानगर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी व्यक्त केली.