Join us
Daily Top 2Weekly Top 5

वरळीच्या आगीतून १० जणांसह ३ श्वान सुखरुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2020 18:27 IST

बुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारस विझविण्यात आली.

मुंबई : वरळी येथे एका खासगी इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घरात मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीतून ७ महिला, २ पुरुष, १ मुलगा आणि ३ पाळीव श्वानांना जिन्यावरून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास वरळी येथे तळमजला अधिक १४ माळे असे बांधकाम असलेल्या खासगी इमारतीच्या १० व्या मजल्यावरील एका घरात आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, ए.सी. युनिट, एल.पी.जी सिलेंडर, लाकडी फर्निचर, लाकडी मूर्ती, ऑफीस दस्तावेज जळाले.सदर आगीची माहिती मिळताच ५ फायर इंजिन, १ रेस्क्यू व्हॅन, ४ जेटी, २ कामगार, अभियंता घटनास्थळी दाखल झाले. तब्बल तीन ते साडेतीन तासांनी येथील आग बुधवारी पहाटे पावणे चारच्या सुमारस विझविण्यात आली.

 

टॅग्स :वरळीआगकुत्रा