हवाई सेवेबाबत ३८६० तक्रारी; ऑक्टोबर महिन्यात उड्डाणाला विलंब, अडीच लाख प्रवाशांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 12:45 AM2019-12-02T00:45:59+5:302019-12-02T00:46:20+5:30

आॅक्टोबर महिन्यात एकूण ७९१ तक्रारी करण्यात आल्या

3 complaints about air service; Flight delays in October, hit 2.5 million passengers | हवाई सेवेबाबत ३८६० तक्रारी; ऑक्टोबर महिन्यात उड्डाणाला विलंब, अडीच लाख प्रवाशांना फटका

हवाई सेवेबाबत ३८६० तक्रारी; ऑक्टोबर महिन्यात उड्डाणाला विलंब, अडीच लाख प्रवाशांना फटका

Next

- खलील गिरकर

मुंबई : आॅक्टोबर महिन्यात देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या ७९१ प्रवाशांनी हवाई सेवेबाबत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे तक्रार नोंदवली आहे. या तक्रारींपैकी ३९६ तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून ११४ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या सर्व ११४ तक्रारी एकट्या एअर इंडियाच्या प्रवाशांनी केलेल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात ३८६० प्रवाशांनी तक्रार केली आहे.
आॅक्टोबर महिन्यात एकूण ७९१ तक्रारी करण्यात आल्या. हे प्रमाण प्रति १० हजार प्रवाशांमागे ०.६४ टक्के आहे. या तक्रारींमध्ये सर्वात जास्त २८१ तक्रारी इंडिगोच्या सेवेबाबत करण्यात आल्या आहेत. स्पाईसजेटबाबत १५२, गोएअर बाबत ६९, एअर एशिया बाबत ३२, विस्ताराबाबत ६, ट्रुजेट बाबत २ व एअर डेक्कन बाबत ३ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.
उड्डाणाला विलंब, उड्डाण रद्द, विमानात प्रवेश रोखण्याच्या प्रकाराचा २४६५६९ प्रवाशांना फटका, सुविधांवर २ कोटी ६९ लाख ९७ हजार खर्च, उड्डाणाला विलंब होणे, उड्डाण रद्द होणे, विमानात प्रवेश रोखणे अशा विविध प्रकारांचा फटका २ लाख ४६ हजार ५६९ प्रवाशांना बसला त्यांच्यावर विविध सुविधांसाठी २ कोटी ६९ लाख ९७ हजार खर्च करण्यात आला आहे. स्पाईसजेटच्या ६८८५ प्रवाशांना बसला त्यांना नाष्टा, दुसºया विमानाचे तिकीट देणे, परतावा अशा सुविधांवर २४ लाख २३ हजार खर्च करण्यात आले.
६४८५ प्रवाशांना उड्डाण रद्द झाल्याचा फटका बसला त्यांना पुरवण्यात आलेल्या सुविधांवर २० लाख ८१ हजार खर्च करण्यात आले. उड्डाणाला दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याचा फटका सर्वात जास्त इंडिगोच्या ९३ हजार ७७१ प्रवाशांना बसला.
तर, एअर इंडियाच्या ६३ हजार १८९ व स्पाईसजेटच्या ४५ हजार ३२६ प्रवाशांना फटका बसला.

Web Title: 3 complaints about air service; Flight delays in October, hit 2.5 million passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.