A 29-year-old doctor commits suicide at KEM Hospital in Mumbai | केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या
केईएम रुग्णालयात २९ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या

मुंबई: मुंबईतील केईएम रुग्णालयातील 29 वर्षीय डॉक्टर प्रणय जयस्वाल यांनी आत्महत्या केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान या संर्दभात प्रणय जयस्वाल यांच्यासोबत एकत्र खोलीत राहणारे डॉक्टर समर्थ पटेल यांनी सांगितले की, प्रणय हे सिनियर रेसीडेन्स जनरल सर्जरी असून त्यांनी एमएसचे शेवटचे वर्ष पूर्ण केले आहे. तसेच प्रणय घरगुती कारणामुळे गेल्या पाच सहा महिन्यांपासून वैफल्यग्रस्त असल्याचे समर्थ यांनी सांगितले.

Web Title: A 29-year-old doctor commits suicide at KEM Hospital in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.