28 crore fine during Corona period | कोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली

कोरोना काळात २८ कोटींची दंडवसुली

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोना, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी २८ कोटी ४० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विविध आयुक्तालय आणि अधीक्षक कार्यालयातून ही आकारणी करण्यात आल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले.
२२ मार्च ते २६ सप्टेंबरपर्यंत संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी २ लाख ७० हजार ५७१ गुन्हे नोंद झाले आहेत. त्याबाबत ३७ हजार ४२ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर गुन्हांसाठी संबंधितांकडून २८ कोटी ४० लाख ६० हजार २६४ रुपये दंड वसूल करण्यात आला.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: 28 crore fine during Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.