अंधेरीत २५ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 06:06 IST2019-01-20T06:06:26+5:302019-01-20T06:06:36+5:30

अंधेरीत २५ वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डी.एन.नगर पोलिसांनी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे.

 A 25-year-old girl was murdered in the dark | अंधेरीत २५ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

अंधेरीत २५ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या

मुंबई : अंधेरीत २५ वर्षीय तरुणीची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डी.एन.नगर पोलिसांनी काहींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे.
आसमा निसार शेख (२५) ही तरुणी अंधेरीत राहायची. शनिवारी सकाळी ९च्या सुमारास तिचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह जंगल परिसरात स्थानिकांना आढळला. ओळख पटू नये, म्हणून तिच्या डोक्यावर दगडाने हल्ला करत, तिचा चेहरादेखील ठेचला होता. डी. एन.नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविला. तासाभरानंतर तिची ओळख पटली. आसमा ही शुक्रवारी रात्रीपासून घरातून बेपत्ता होती. ती साडेआठच्या सुमारास घरातून बाहेर पडली. मात्र, परतली नाही, पण तिला अशाप्रकारे बाहेर राहण्याची सवय होती, असे तिच्या आईने पोलिसांना सांगितले. त्यामुळे घरच्यांनी ती बेपत्ता असण्याची तक्रार केली नसल्याचे, डी.एन.नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परमेश्वर गणमे यांनी सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, सुनीताचा स्थानिक परिसरातील काही लोकांशी वाद झाला होता. त्यांनीच तिची हत्या केल्याचा संशय आहे. डी.एन.नगर पोलिसांनी चौकशीसाठी विशेष पथक नेमले आहे.

Web Title:  A 25-year-old girl was murdered in the dark