मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2020 08:15 AM2020-12-01T08:15:02+5:302020-12-01T08:15:16+5:30

पालिका शिक्षण विभागामध्ये ११६१ शिक्षक ९वी ते १२वीच्या वर्गासाठी कार्यरत असून ७१३ शिक्षकांच्या चाचण्या पार पडल्या असून त्यातील ३ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

24 teachers in Mumbai, 10 non-teaching staff positive; Municipal Corporation concerned | मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत

मुंबईतील २४ शिक्षक, १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह; महापालिका चिंतेत

Next

मुंबई : मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा या ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार असल्या तरी शाळा सुरू करणार म्हणून मुंबईतील ज्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यामध्ये एकूण २४ शिक्षक आणि १० शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. यामधील ३ शिक्षक हे महापालिका शिक्षण विभागातील आहेत, तर इतर मुंबईतील पश्चिम, उत्तर आणि दक्षिण विभागातील आहेत. 

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार म्हणून शिक्षण विभागाकडून शिक्षकांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश देण्यात आले. मुंबई उपसंचालक कार्यालयाच्या अखत्यारीत नववी ते बारावीच्या एकूण १८०२ शाळा असून यामध्ये ७ लाख ५१ हजार २४२ विद्यार्थी शिकत आहेत. ९वी ते १२वीला शिकविणाऱ्या शिक्षकांची संख्या १९ हजार ४४२ असून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ९ इतकी आहे. यामध्ये पश्चिम विभागातील ४०७२, उत्तर विभागातील २१२२ तर दक्षिण विभागातील १५२१ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. या ७७१५ शिक्षकांमध्ये २१ शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर २३२९ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्यांमध्ये १० कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती उपसंचालक अनिल साबळे यांनी दिली. 

पालिका शिक्षण विभागामध्ये ११६१ शिक्षक ९वी ते १२वीच्या वर्गासाठी कार्यरत असून ७१३ शिक्षकांच्या चाचण्या पार पडल्या असून त्यातील ३ शिक्षक पॉझिटिव्ह आल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली. दरम्यान, मुंबई महापालिका क्षेत्रातील शाळा डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयानंतर या चाचण्यांना स्थगिती देण्यात आली. ज्या शिक्षक, शिक्षकेतरांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या त्यातील शिक्षकांच्या चाचण्या पॉझिटिव्ह असल्याचे प्रमाण नगण्य असले तरी शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या कारणाने ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन शिक्षण सुरू राहणार असल्याने शिक्षकांसाठी जारी करण्यात आलेला ५०% उपस्थितीचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी मागणी शिक्षकांमधून होत आहे. 

अशैक्षणिक कामांचा भार पुन्हा 
त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना घरोघरी जाऊन मतदार याद्या दुरुस्तीचे काम शिक्षकांना देण्यात येत असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. ५०% उपस्थितीमुळे शिक्षकांना शाळेत हजेरी लावावी लागत आहे, सोबतच ऑनलाइन वर्गही सांभाळावे लागत आहेत. यात आता मतदार याद्या दुरुस्तीचे काम म्हणजे शिक्षकांना कोरोना संसर्गाचे निमंत्रणच असल्याची प्रतिक्रिया शिक्षक देत आहेत. त्यामुळे कोरोना काळात तरी शिक्षकांना ही कामे देऊ नयेत, अशी मागणी शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे. 

Web Title: 24 teachers in Mumbai, 10 non-teaching staff positive; Municipal Corporation concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.