सहा महिन्यांत धावणार २४ डब्यांच्या एक्स्प्रेस, प्रवाशांची संख्या वाढल्यानं कोचेस वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 02:18 AM2023-05-31T02:18:57+5:302023-05-31T02:19:11+5:30

आता मध्य रेल्वे सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.

24 coach express will run in six months coaches will increase as the number of passengers increases | सहा महिन्यांत धावणार २४ डब्यांच्या एक्स्प्रेस, प्रवाशांची संख्या वाढल्यानं कोचेस वाढणार

सहा महिन्यांत धावणार २४ डब्यांच्या एक्स्प्रेस, प्रवाशांची संख्या वाढल्यानं कोचेस वाढणार

googlenewsNext

मुंबई :  मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, दादर, एलटीटी येथे दररोज शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्यांची ये-जा सुरू असते. त्यातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात; मात्र आता प्रवाशांची संख्या वाढत असल्याने एक्स्प्रेसच्या डब्यांचीही संख्या वाढवण्यात येत आहे; परंतु सीएसएमटी येथील काही फलाटांची लांबी कमी असल्याने २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी करता येत नाही. त्यामुळे आता मध्य रेल्वे सीएसएमटीवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहण्यासाठी फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे.

२४ डब्यांच्या रेल्वेसाठी केवळ पाच फलाट उपलब्ध असल्याने आता फलाट क्रमांक १० ते १३ क्रमांकाच्या फलाटाचे विस्तारिकरण करण्यात येणार आहे. आता या फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सुरू करण्यात आले असून, डिसेंबरपर्यंत सीएसएमटीवरून २४ डब्यांच्या एक्स्प्रेस धावणार आहेत. चारही फलाटांची लांबी वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, या सर्व फलाटांवर २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहू शकतील. 

प्रतीक्षा यादीदेखील कमी होईल
सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १० ते १३ चे विस्तारिकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार फलाटांवरून दररोज १० गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करता येईल. एका गाडीतून साधारण पाच हजार प्रवाशांचा फायदा होईल, तसेच प्रतीक्षा यादीदेखील कमी होईल. प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसुलही वाढेल.

वाहतूक होणार सुरळीत
सीएसएमटीवरून दररोज ९० लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. चार फलाटांचे विस्तारिकरण पूर्ण झाल्यास इतर टर्मिनसवरील एक्स्प्रेसची वाहतूक सुरळीत करणे सोयीस्कर होणार आहे. तसेच मुंबई ते पुणे धावणाऱ्या एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ करता येणे मध्य रेल्वेला शक्य होणार आहे. विस्तारिकरण असे होणार..फलाट क्रमांक १० आणि ११ ची लांबी २९८ मीटर असून, ती आता ६८० मीटरपर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे, तर, फलाट क्रमांक १२ आणि १३ ची लांबी ३८५ मीटर असून, ती ६९० मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे.

फलाट विस्तारिकरणाचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच या कामानंतर ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची कामे केली जाणार आहेत. डिसेंबरअखेपर्यंत चारही फलाटांच्या विस्तारिकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
डॉ. शिवराज मानसपुरे,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

Web Title: 24 coach express will run in six months coaches will increase as the number of passengers increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.