मध्यरात्री १ वाजता गच्चीवर गेला, सकाळी बॉडी सापडली; मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:35 IST2026-02-04T16:25:56+5:302026-02-04T16:35:31+5:30
मुंबईमधील आयआयटीमधील एक विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उटलले. मध्यरात्री एक वाजता नमन अग्रवाल याने गच्चीवर जात खाली उडी मारली.

मध्यरात्री १ वाजता गच्चीवर गेला, सकाळी बॉडी सापडली; मुंबईत आयआयटीच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल
मुंबईतील आयआयटीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. नमन अग्रवाल असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. आयआयटी बॉम्बे येथील हॉस्टेल नंबर चारच्या गच्चीवरून त्याने मध्यरात्री १ वाजता उडी मारली. यामुळे परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पवई येथील आयआयटीमध्ये शिकणाऱ्या नमन अग्रवाल या विद्यार्थ्याने मध्यपात्री १ वाजता हॉस्टेलच्या गच्चीवरून उडी मारली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. नमन दुसऱ्या वर्षाचे B-Tech अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तो राजस्थानमधील पिलाणी येथील रहिवासी होता. तो आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक ४ मध्ये राहत होता.
या प्रकरणात नमन याच्या खोलीत कोणतीही चिठ्ठी आढळलेली नाही. यामुळे आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. वई पोलिस या संबंधात तपास करत आहेत. या घटनेबाबत आयआयटी बॉम्बे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.
मागील पाच वर्षात देशभरातील आयआयटीमध्ये ३५ हून अधिक विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.