नेहमी इंग्रजीत बोलत असल्याने मित्राची गळ्यावर सुऱ्याने 54 वार करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 20:04 IST2018-03-23T20:04:05+5:302018-03-23T20:04:05+5:30

नेहमी इंग्रजीत बोलायचा. याचा राग डोक्यात ठेवून त्याची वार करून हत्या केली.

21-YEAR-OLD STABBED HIS FRIEND 54 TIMES BECAUSE HE ALWAYS SPOKE IN ENGLISH | नेहमी इंग्रजीत बोलत असल्याने मित्राची गळ्यावर सुऱ्याने 54 वार करून हत्या

नेहमी इंग्रजीत बोलत असल्याने मित्राची गळ्यावर सुऱ्याने 54 वार करून हत्या

मुंबईः मित्र नेहमी इंग्रजी भाषेत बोलत असल्याने वैतागलेल्या एका तरूणाने मित्राच्या गळ्यावर तब्बल 54 वेळा सुऱ्याने वार केल्याची घटना घडली आहे. मोहम्मद आमिर अब्दुल वाहिद रहिन असं 21 वर्षीय आरोपीचं नाव असून त्याने त्याच्या 18 वर्षीय मित्राची सुऱ्याने वार करून हत्या केली. मोहम्मद अफ्रोज अलम शेख असं हत्या झालेल्या मुलाचं नाव आहे. शेख नेहमी इंग्रजीत बोलायचा. याचा राग डोक्यात ठेवून त्याची रहिनने वार करून हत्या केली. शेख इंग्रजीत बोलून नेहमी कमीपणाची जाणीव करून द्यायचा, असं रहिनचं म्हणणं  होतं. बुधवारी वांद्रेमध्ये ही घटना घडली आहे. 

रहिन हा शेखवर प्रचंड चिडला होतो म्हणूनच त्याने एक आठवड्यापासून शेखची हत्या करण्याचं ठरवलं होतं. योग्य वेळ व ठिकाणीची तो वाट पाहत होता, अशी माहिती शाहू नगर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस अधिकारी डीबी थोरात यांनी दिली आहे.
बुधवारी रहिन पिण्याचं आमिष दाखवून शेखला वांद्र्याला घेऊन गेला. तेथे शेख शौचालयात गेला. त्याच्यामागे रहिनही शौचालयात गेला. हीच संधी सांधून त्याने शेखवर हल्ला केला. रहिनने शेखच्या गळ्यावर सुऱ्याने 54 वार केले. शेखचा जीव जाईपर्यंत तो वार करत राहिला. घटनेनंतर शेखला सायन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. 

मोहम्मद अफ्रोज अलम शेख हा दोन वर्षापूर्वी मधुबनीहून मुंबईत आला होता. त्याने दहावीच्या परीक्षेसाठी फॉर्मही भरला होता. पण यावेळी त्याने परीक्षा दिली नाही, अशी माहिती शेखच्या भावाने दिली आहे. 

Web Title: 21-YEAR-OLD STABBED HIS FRIEND 54 TIMES BECAUSE HE ALWAYS SPOKE IN ENGLISH