पश्चिम उपनगरात २० टक्के पाणीकपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:42 AM2018-07-23T03:42:36+5:302018-07-23T03:43:00+5:30

आजपासून दुरूस्तीचे काम सुरू; कमी दाबाने पाणीपुरवठा होणार

20% watercourse in the western suburbs | पश्चिम उपनगरात २० टक्के पाणीकपात

पश्चिम उपनगरात २० टक्के पाणीकपात

Next

मुंबई : वेरावली टेकडी जलाशयाला पाणीपुरवठा करणाऱ्या १२०० मि.मी. व्यासाच्या आरे अंतर्गामी जलवाहिनीवर महत्त्वाचे तांत्रिक काम वेरावली टेकडी जलाशय, महाकाली गुंफा रोड, अंधेरी (पूर्व) येथे २४ जुलै रोजी दुपारी २ वाजता हाती घेण्यात येणार असून हे काम सायंकाळी ७ वाजता पूर्ण होणे अपेक्षित आहे. परिणामी या वेळेदरम्यान पश्चिम उपनगरात २० टक्के पाणीकपात करण्यात येणार असून, येथील परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
के/पूर्व विभागातील बी.टी. रोड, समर्थनगर, आर.आर. ठाकूर मार्ग, प्रतापनगर, शिवटेकडी, पारसनगर, आनंदनगर, अग्रवालनगर, जोगेश्वरी केव्हज रोड, एच. एफ. सोसायटी रोड, पी.पी. डायस कंपाउंड, नटवरनगर १ ते ५, सारस्वत बाग, फ्रान्सिसवाडी, साई सिद्धी संकुल, सुभाष रोड, बांद्रेकरवाडी, प्रेमनगर, इदगाह मैदान, अंधेरी प्लॉट, बांद्रा प्लॉट, इन्कमटॅक्स कॉलनी, हेमा इंडस्ट्री, मेघवाडी रोड क्रमांक २, मेघवाडी शाखा, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व), पंप हाउस, जिजामाता रोड, वास्तू संकुल, विजय राऊत रोड, अपना घर रेल्वे कॉलनी, जुना नागरदास रोड, आंबेवाडी, आर.के. सिंग रोड, पी.पी. रोड, गुंदवली गावठाण, मोगरापाडा, अंधेरी (पूर्व) या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.
के/पश्चिम विभागातील पटेल इस्टेट, वैशालीनगर, अमृतनगर, एस.व्ही. रोड परिसर, शास्त्रीनगर, अक्षा मशीद परिसर, आर.सी. पटेल चाळ, क्रांतीनगर, गुलशन नगर, अजित ग्लास परिसर, रेलीफ रोड, बेहराम बाग, विकासनगर, परेरा कंपाउंड, शक्तीनगर, पटेल वाडी, स्काऊट कॅम्प रोड, काजूपाडा, आनंदनगर, पाटलीपुत्र म्हाडा, गणेशनगर, प्रथमेश संकुल, साईनाथनगर, कंट्री क्लब परिसर, सहकार रोड, जोगेश्वरी स्टेशनजवळील परिसर, कॅप्टन सुरेश सामंत रोड, अग्रवाल इस्टेट, यादवनगर, जोगेश्वरी (पश्चिम) या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल.
पी/दक्षिण विभागातील बिंबीसार म्हाडा, एस.आर.पी.एफ. कॅम्प, महानंद डेअरी, बांद्रेकरवाडी ते नेस्को, वनराई कॉलनी, गोरेगाव (पूर्व) व ओ.डी.सी., राम मंदिर, गोरेगाव (पश्चिम) विभागातील ना.सी. फडके मार्ग, तेली गल्ली, जीवा महाले रोड या भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल. परिणामी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करावे.

आधीच पुरेसा पाणीसाठा करण्याचे आवाहन
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशी पुरेसा पाण्याचा साठा करावा व पाणी काटकसरीने वापरून महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिंबीसार म्हाडा, एस.आर.पी.एफ. कॅम्प, महानंद डेअरी, बांद्रेकरवाडी ते नेस्को, वनराई कॉलनी, तेली गल्ली, जीवा महाले रोड आदी भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होईल

Web Title: 20% watercourse in the western suburbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.