२० खासगी विद्यालयांच्या ‘अल्पसंख्याक’ला स्थगिती; कारवाईत मुंबईतील सहा शाळांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 08:02 IST2026-03-06T08:02:19+5:302026-03-06T08:02:43+5:30
काही शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत महिन्याभरापासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. या संदर्भात राज्यात विविध ठिकाणी पालक आणि पालक संघटनांनी आवाजही उठवला होता.

२० खासगी विद्यालयांच्या ‘अल्पसंख्याक’ला स्थगिती; कारवाईत मुंबईतील सहा शाळांचा समावेश
घन:श्याम सोनार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अल्पसंख्याक प्रमाणपत्रांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील २० खासगी शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्रांना प्राथमिक शिक्षण संचालकांनी बुधवारी स्थगिती दिली. त्यात पोद्दार एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या मुंबईतील ५ शाळांचा समावेश आहे.
काही शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक प्रमाणपत्राबाबत महिन्याभरापासून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. या संदर्भात राज्यात विविध ठिकाणी पालक आणि पालक संघटनांनी आवाजही उठवला होता. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त काही शाळा प्रचलित नियमांचे पालन करत नसल्याचे आरोपही केले होते. पालक संघटनेचे अध्यक्ष मुकुंद किर्दत यांनी शिक्षण विभागाकडे तक्रारीही केल्या होत्या. संबंधित शाळा प्रवेश प्रक्रिया, शुल्क आणि इतर बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही त्यांनी तक्रारीत म्हटले होते.
अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र स्थगित केलेल्या २० खासगी शाळांपैकी ६ शाळा मुंबईतील आहेत. त्यात पोद्दार एज्युकेशन ट्रस्टच्या ५ शाळा आहेत. उर्वरित १० शाळा विदर्भातील बुलढाणा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांतील आहेत. तर संभाजीनगर १ शाळा, ठाणे २ आणि कोल्हापूरमधील एका शाळेचा त्यात समावेश आहे.
राज्यातील २० खासगी शाळांना देण्यात आलेले अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राला अल्पसंख्याक विभागाने दिलेल्या आदेशानुसार स्थगिती दिली आहे.
शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय
मुस्लिम २,५९९ १,०२२
शीख ४१४ -
जैन ६३६ ३८
ख्रिश्चन ५,४९२ १,९६२
पारसी ८९६ १६८
बौद्ध १८६ ३६
भाषिक
अल्पसंख्याक १३,८३२ २३८०
एकूण शाळा २४,०५५ ५७१४
अल्पसंख्याक दर्जाप्राप्त काही शाळा प्रचलित नियमांचे पालन करत नसल्याचे आरोपही करण्यात आले होते. त्यानंतर कारवाई सुरू झाली.