कॉकपीटमध्ये घुसले २ प्रवासी, सात तास लटकले विमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 10:18 IST2025-07-18T10:18:16+5:302025-07-18T10:18:26+5:30
स्पाईसजेटचे विमान सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी उड्डाणासाठी धावपट्टीकडे निघाले होते. त्याचवेळी दोन प्रवासी आपल्या आसनावरून उठून कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले.

कॉकपीटमध्ये घुसले २ प्रवासी, सात तास लटकले विमान
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्लीहून मुंबईला येणाऱ्या स्पाईसजेटचे विमान धावपट्टीवर जात असताना दोन प्रवाशांनी कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित विमान पुन्हा पार्किंगमध्ये नेण्यात आले आणि या प्रवाशांना विमानतळ सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हाती सोपवण्यात आले. मात्र, या सर्वांमध्ये या विमानाला उड्डाणासाठी सात तासांचा विलंब झाला.
स्पाईसजेटचे विमान सकाळी ७ वाजून २१ मिनिटांनी उड्डाणासाठी धावपट्टीकडे निघाले होते. त्याचवेळी दोन प्रवासी आपल्या आसनावरून उठून कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले. विमानातील वातानुकूलित यंत्रणा नीट नसल्याचा आरोप ते करत होते. हे दोन्ही प्रवासी कॉकपीटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहताच विमानातील केबिन कर्मचाऱ्यांनी तातडीने त्यांच्यापर्यंत धाव घेत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना जागेवर बसण्याची सूचना केली. मात्र, या दोन्ही प्रवाशांनी केबिन कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. वैमानिकानेदेखील त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे प्रवासी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर वैमानिकाने विमान पुन्हा पार्किंगमध्ये नेले.