लॉकडाऊनमध्ये २ लाख गुन्हे; नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2020 04:20 AM2020-08-16T04:20:56+5:302020-08-16T04:21:08+5:30

या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत संबंधित आरोपींवर कारवाईही करण्यात आली आहे.

2 lakh crimes in lockdown; Violation of rules | लॉकडाऊनमध्ये २ लाख गुन्हे; नियमांचे उल्लंघन

लॉकडाऊनमध्ये २ लाख गुन्हे; नियमांचे उल्लंघन

Next

मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोरोनासंदर्भात नियमांचे उल्लंघन करणारे २ लाख २८ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत संबंधित आरोपींवर कारवाईही करण्यात आली आहे.
२२ मार्च ते १३ आॅगस्टपर्यंत संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणारे २ लाख २८ हजार ७६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यामध्ये ३३ हजार ३५९ जणांना अटक करण्यात आली. यातील विविध गुन्ह्यांसाठी २० कोटी ६२ लाख ५३ हजार ४९४ रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ७ लाख ४३ हजार ४८४ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९५ हजार ८१८ वाहने जप्त करण्यात आली.

Web Title: 2 lakh crimes in lockdown; Violation of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.