वीज बिलात  २ टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 15:33 IST2020-11-08T15:33:38+5:302020-11-08T15:33:59+5:30

Electricity bill : थकबाकी वसूल होण्याकरिता बेस्टने वीज ग्राहकांना सूट दिली.

2% 'Best' discount on electricity bill | वीज बिलात  २ टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट

वीज बिलात  २ टक्क्यांची ‘बेस्ट’ सूट

 

मुंबई : कोरोनादरम्यान लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात वीज ग्राहकांना मदत करण्याकरिता, वीज बिल भरण्यास प्रोत्साहन करण्याकरिता, वीज बिलाची थकबाकी वसूल होण्याकरिता बेस्टने वीज ग्राहकांना सूट दिली आहे.

बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, पर्याय् एक मध्ये वीज ग्राहकाने नोव्हेंबर महिन्याचे वीज बिल तत्काळ भरले तर त्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावरील प्रदान आकार आणि वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज माफ करण्यात येईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या वीज वापराच्या बिलात २ टक्के सूट देण्यात येईल.

पर्याय दोनमध्ये नोव्हेंबरचे वीज बिल नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीमध्ये भरल्यास एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमधील वीज वापरावर विलंब शुल्क आणि व्याजात सूट दिली जाईल. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वीज वापराच्या बिलावर १ टक्का सुट दिली जाईल.

तिन्ही हप्ते वेळेत भरले तर व्याजबाबत सुट दिली जाईल. हे पर्याय ग्राहकांना पुर्णपणे स्वीकारावे लागतील. अंशत: पुर्तता केलेल्या ग्राहकांना याचे फायदे मिळणार नाहीत. हप्ता भरल्यानंतर ग्राहक त्यावरील सुट मिळविण्यास पात्र राहील. ती पुढील बिलात समाविष्ट केली जाईल. शिवाय ज्यांनी वेळेत बिले भरली आहेत त्यांना २ टक्के सुट प्रदान केली जाणार आहे.

Web Title: 2% 'Best' discount on electricity bill