धूळवड खेळताना १८ जण जखमी; डोळ्यांना, शरीराला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:57 IST2026-03-04T06:56:53+5:302026-03-04T06:57:02+5:30

मुंबईतील सायन रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम या रुग्णालयांत १८ जणांना दाखल करण्यात आले. 

18 people injured while playing in the mud; eyes and body injured | धूळवड खेळताना १८ जण जखमी; डोळ्यांना, शरीराला झाली दुखापत

धूळवड खेळताना १८ जण जखमी; डोळ्यांना, शरीराला झाली दुखापत

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धूलिवंदनाच्या उत्सवात मुंबईत ठिकठिकाणी अनेक जण जखमी झाले. त्यांना मुंबईतील सायन रुग्णालय, नायर रुग्णालय, केईएम या रुग्णालयांत १८ जणांना दाखल करण्यात आले. 
डोळ्यांत रंग गेल्याने, पाण्याच्या फुग्यांचा फटका बसल्याने तर काहींच्या त्वचेवर पुरळ आले असून, त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले आहेत. 

केईएम रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात पाच जखमी रुग्ण दाखल झाले. यापैकी अवधूत घावस्ते (१२ वर्षे) याला पाठीच्या वरच्या भागाला मार, देवांश थोरात (५ वर्षे) याच्या पूर्ण शरीरावर पुरळ, आरोही कुमार (६ वर्षे) हिच्या डोक्याला व डाव्या हाताला मार, संदीप वारबडेकर (५० वर्षे) यांना पाण्याच्या फुग्यामुळे मांडीला, तर खनक जैन (१० वर्षे)च्या डोळ्याला दुखापत झाली. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिष्ठात्या डॉ.संगीता रावत यांनी दिली. 

डोळ्यांत रंग जाणे, त्वचेची जळजळ या तक्रारींसह दाखल झालेल्या ६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.प्रमोद इंगळे यांनी सांगितले, तर नायर रुग्णालयात दाखल ७ रुग्णांपैकी दोघांना डोळ्यांना, दोघांच्या डोक्याला दुखापत व एकाचे दात पडल्याचे अधिष्ठाता डॉ.शैलेश मोहिते यांनी सांगितले. 

मारहाणीत तरुणाचा मृत्यू
धूलिवंदनानंतर आयमॅक्स परिसरात झालेल्या मारहाणीच्या घटनेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. वडाळा ट्रक टर्मिनस परिसरातील तुषार सुनील उंजनवाल (१८) याला गंभीर जखमी अवस्थेत सायन रुग्णालयात आणले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सायन रुग्णालयाने दिली. मृत तरुणाच्या हाता-पायाच्या बोटांना, चेहऱ्यावर गंभीर दुखापत 
झाली होती.

Web Title : मुंबई में होली का रंग फीका: 18 लोग घायल, एक की मौत

Web Summary : मुंबई में होली के जश्न में सायन और केईएम जैसे अस्पतालों में 18 लोग घायल हुए। आंखों में रंग जाने से लेकर पानी के गुब्बारों से चोटें आईं। दुखद रूप से, आईमैक्स के पास होली के बाद हुई मारपीट में एक युवक की मौत हो गई।

Web Title : Holi Celebrations Turn Sour: 18 Injured in Mumbai Festivities

Web Summary : Mumbai's Holi celebrations led to 18 injuries across hospitals like Sion and KEM. Injuries ranged from eye irritation to physical trauma from water balloons. Tragically, a young man died after a post-Holi altercation near IMAX; he was severely beaten.

टॅग्स :Holiहोळी 2026