कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण, १०९ जणांचे अलगीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 07:53 IST2020-03-20T07:53:33+5:302020-03-20T07:53:45+5:30
गुरुवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात ९६ , मिराज हॉटेल येथे ६ आणि निरंता हॉटेलमध्ये ७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अशा प्रकारे १०९ जणांचे अलगीकरण करण्यात आले.

कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण, १०९ जणांचे अलगीकरण
मुंबई : मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाचे १८ रुग्ण दाखल असून त्यात ९ मुंबईतील तर अन्य ९ मुंबईबाहेरील आहेत. गुरुवारी सेव्हन हिल्स रुग्णालयात ९६ , मिराज हॉटेल येथे ६ आणि निरंता हॉटेलमध्ये ७ आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे अशा प्रकारे १०९ जणांचे अलगीकरण करण्यात आले. कस्तुरबात बाह्यरुग्ण सेवा देण्यात येत आहे. तर संशयित कोरोना रुग्णांकरिता कक्ष क्रमांक नऊ येथे हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. याखेरीज, विलगीकरण कक्ष क्रमांक ३० असून यात रुग्णांचे विलगीकरण केले आहे. अलगीकरणासाठी पालिकेच्या वतीने बड्या हॉटेलमध्ये खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यात हॉटेल निरंतरा ३, जेडब्ल्यू मॅरिएट जुहू ८०, हॉटेल मिराज ४० आणि हॉटेल रेनिसान्स १०० इतक्या खाटांचा समावेश आहे.
गुरुवारची आकडेवारी
बाह्यरुग्ण विभागात दाखल-३८४
रुग्णालयात भरती एकूण रुग्ण-१००
एकूण भरती संशयित रुग्ण-१०६
पॉझिटिव्ह मुंबईतील रुग्ण-१
पॉझिटिव्ह मुंबईबाहेरील रुग्ण-१
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- २
मृत रुग्णांची संख्या -०
घरी सोडलेले एकूण रुग्ण -८४
अलगीकरण केलेले
एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी- १०९