राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 05:52 IST2025-12-12T05:50:42+5:302025-12-12T05:52:13+5:30
गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये हाेती.

राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
मुंबई : उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगाने वाहू लागले असून यामध्ये आणखी वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून संपूर्ण राज्यभरातील अनेक शहरांचे किमान तापमान १० अंश सेल्सिअसच्या आसपास किंवा खाली नोंदविण्यात येत आहे.
गुरुवारी मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईकरांना माथेरानचा फिल येत असल्याचे चित्र आहे. यापेक्षाही जास्त थंडी अहिल्यानगरमध्ये हाेती.
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
राज्यातील शहरांचे किमान तापमान
अहिल्यानगर ६.६0
गोंदिया ८0
नागपूर ८.१0
नाशिक ८.२0
नांदेड ८.८0
मालेगाव ८.८0
वर्धा ९.९0
यवतमाळ १०0
सातारा १०0
अकोला १०0
धाराशिव १०.२0
गडचिरोली १०.२0
अमरावती १०.२0
परभणी १०.४0
छ. संभाजीनगर १०.८0
चंद्रपूर १०.८0
वाशिम ११0
महाबळेश्वर ११.१0
बुलढाणा १२.२0
सांगली १२.३0
नंदुरबार १२.४0
सोलापूर १३.२0
कोल्हापूर १४.४0
डहाणू १५.२0
मुंबई १५.६0
माथेरान १७.४0
उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारेगार झाला असून शुक्रवारी देखील थंडीचा कडाका कायम राहील. विशेषतः मध्य महाराष्ट्रामध्ये किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त पुणे आणि मुंबई या शहरात देखील किमान तापमान कमीच राहील.
कृष्णानंद होसाळीकर,
ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ
उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली असून येथून शीत वारे महाराष्ट्राकडे वाहत आहेत. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक शहरांचे किमान तापमान ६ ते १५ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविण्यात येत आहे. यामध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागांचा समावेश आहे.