Join us

कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी धावणार 162 स्पेशल गाड्या; चाकरमान्यांना मिळणार दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 14:02 IST

14 ऑगस्टला सुटणार पहिली गाडी आहे.

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची अधिकृत घोषणा कोकण रेल्वेकडून करण्यात आली आहे. नियोजित वेळापत्रक 15 ते 5 सप्टेंबर दरम्यानस 162 गाड्या सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी माहिती दिली आहे.

14 ऑगस्टला सुटणार पहिली गाडी आहे. 14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत सुटणाऱ्या 162 गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. 81 अप तर 81 डाऊन अशा रेल्वेच्या फेऱ्या असणार आहे. याबाबत लवकरच अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात येईल अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :कोकण रेल्वेमहाराष्ट्रमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस