राहुल नार्वेकरांसह १६ आरोपी कोर्टात हजर; बेस्ट विरोधातील आंदोलन प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 10:36 IST2023-10-17T10:36:05+5:302023-10-17T10:36:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड काळात बेस्टने वाढीव वीज बिल आकारल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह ...

राहुल नार्वेकरांसह १६ आरोपी कोर्टात हजर; बेस्ट विरोधातील आंदोलन प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड काळात बेस्टने वाढीव वीज बिल आकारल्याचा आरोप करत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेस्टविरोधात आंदोलन केले होते.
या प्रकरणी आरोप निश्चित करण्यात आले असून नार्वेकर, आमदार अतुल शहा यांच्यासह १६ जण सोमवारी कोर्टात हजर झाले होते. कोविडमुळे पोटाची खळगी भरण्याची चिंता असतानाच बेस्ट प्रशासनाने भरमसाठ बिले ग्राहकांना पाठवली त्या विरोधात भाजपने बेस्टविरोधात आंदोलन केले. या प्रकरणी कुलाबा पोलिस ठाण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह आमदार अतुल शहा व अन्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.
सुनावणी पुढील महिन्यात
सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सोमवारी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी पेन ड्राइव्हच्या माध्यमातून न्यायालयात सादर करण्यात आला. राहुल नार्वेकर यांचे वकील संदीप केकाने यांनी हा पुरावा, प्रत आरोपींना मिळावी अशी मागणी केली तर न्यायालयाने आरोपींची यादी सादर करण्याचे आदेश दिले. प्रकरणावरील सुनावणी १० नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.