ओबीसींच्या संस्थेला देणार १५० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 05:48 IST2020-12-08T05:47:53+5:302020-12-08T05:48:15+5:30
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे.

ओबीसींच्या संस्थेला देणार १५० कोटी
मुंबई : इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) कल्याणासाठी स्थापन झालेल्या राज्य शासनाच्या महाज्योती या संस्थेला आणखी १५० कोटी रुपये देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला.
नागपुरात मुख्यालय असलेल्या महाज्योतीसाठी आधी सरकारने ५० कोटींची तरतूद केलेली आहे. आता विधिमंडळाच्या १४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात वाढीव १५० कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांद्वारे केली जाईल, असे आजच्या बैठकीत ठरल्याची माहिती आहे.
ओबीसींसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक १६ डिसेंबरला होणार आहे, त्यात या सूत्राबद्दल चर्चा केली जाईल. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती आणि आश्रमशाळांसाठीच ३ हजार कोटींचे बजेट दरवर्षी खर्ची पडते. ओबीसी कल्याणाच्या योजना राबविण्यासाठी निधीच दिला जात नाही याबाबत ओबीसी मंत्र्यांनी आजच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, विजय वडेट्टीवार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, हे मंत्री उपस्थित होते.