१५ दिवसांत मलबार हिल जलाशयासाठी १४९ सूचना; सोमवारी पाहणीमुळे मुंबई शहराच्या काही भागात पाणीकपात

By सीमा महांगडे | Published: December 16, 2023 07:02 PM2023-12-16T19:02:07+5:302023-12-16T19:02:27+5:30

मलबार हिल जलशायच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे मलबार नैसर्गिक टेकडी, झाडे आणि रस्ता बाधित होईल.

149 instructions for Malabar Hill Reservoir within 15 days Water cut in some parts of Mumbai city due to inspection on Monday | १५ दिवसांत मलबार हिल जलाशयासाठी १४९ सूचना; सोमवारी पाहणीमुळे मुंबई शहराच्या काही भागात पाणीकपात

१५ दिवसांत मलबार हिल जलाशयासाठी १४९ सूचना; सोमवारी पाहणीमुळे मुंबई शहराच्या काही भागात पाणीकपात

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बाधणीसाठी जी कार्यपद्धती स्वीकारली जाणार आहे याबाबत नागरिकांनी व तज्ञांनी त्यांच्या सूचना पालिकेला कळवाव्यात असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले होते. त्यानुसार १५ दिवसांत पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाकडे १४९ सूचना आणि हरकती सादर झाल्या आहेत.  दरम्यान जलाशयाच्या पुनर्बाधणीच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक, बीएमसीचे अधिकारी आणि स्थानिक तज्ञ यांचा समावेश असलेली तज्ञ समिती स्थापन केली आहे. ही समिती आता या सूचना आणि हरकतींचा अभ्यास करून अहवाल तयार करणार असल्याने या सूचना महत्त्वाच्या ठरणार आहेत. दरम्यान तज्ज्ञ समिती सोमवारी दुसऱ्यांदा मलबार हिल जलाशयाची पाहणी करणार आहे.

मलबार हिल जलशायच्या पुनर्बांधणीच्या कामामुळे मलबार नैसर्गिक टेकडी, झाडे आणि रस्ता बाधित होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली असून, झाडे व इतर पर्यावरणीय बाबींना धक्का न लावता पर्यायी मार्गाने काम करण्याची मागणी केली आहे. या विषयावर सर्वसमावेशक चर्चा करण्यासाठी आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता पर्याय सुचवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीचा अहवाल येईपर्यंत नवीन जलाशयासाठी सध्या सुरू असलेली सर्व कामे स्थगित करण्यात यावीतअशी अंगणी केली आहे. शिवाय झाडांवर लावण्यात टॅग काढून टाकावेत. प्रस्तावित जागेत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बजावण्यात आलेली बेदखल नोटीस मागे घेण्यात यावी, प्रस्तावाबाबतचे सर्व संबंधित अहवाल आणि विश्लेषण पालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावेत, पालिकेने जलाशयासाठी पर्यायी जागा शोधावी तसेच जनभावनेतून उपस्थित झालेला पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने अहवालाच्या आधारे पुढील योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिक आणि पर्यावरण प्रेमी करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता अहवाल तयार करण्यासाठी कशी कार्यपद्धती असावी याबद्दल सूचना तज्ज्ञांनीच द्याव्यात , तयावर पालिका प्रशासन विचार करेल या अनुषंगाने पालिकेच्या पाणी पुरवठा प्रकल्प विभागाकडून सूचना मागवल्या होत्या.
 
उद्या पाणीकपात
१८ डिसेंबर रोजी तज्ज्ञ समिती पुन्हा जलाशयाची पाहणी करणार असल्याने जलाशयाचा पाण्याचा कप्पा रिक्त करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहरातील काही भागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील ए, सी, डी, जी उत्तर, जी दक्षिण या विभागातील नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे असे, आवाहन मुंबई  महानगरपालिकेने नागरिकांना केले आहे.

Web Title: 149 instructions for Malabar Hill Reservoir within 15 days Water cut in some parts of Mumbai city due to inspection on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.