मुंबई उच्च न्यायालयात १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती, केंद्रीय विधि मंत्रालयाने दिली नियुक्तीची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 14:29 IST2025-08-29T14:29:36+5:302025-08-29T14:29:50+5:30
Mumbai High Court News: मुंबई उच्च न्यायालयात १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय विधी मंत्रालयाने ही माहिती दिली.

मुंबई उच्च न्यायालयात १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीशपदी नियुक्ती, केंद्रीय विधि मंत्रालयाने दिली नियुक्तीची माहिती
नवी दिल्ली - मुंबई उच्च न्यायालयात १४ वकिलांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून बुधवारी नियुक्ती करण्यात आली. केंद्रीय विधी मंत्रालयाने ही माहिती दिली. वकील सिद्धेश्वर सुंदरराव ठोंबरे, महरोज अश्रफ खान पठाण, रणजितसिंह राजा भोसले, संदेश दादासाहेब पाटील, श्रीराम विनायक शिरसाट, हितेन शामराव वेणेगावकर, रजनीश रत्नाकर व्यास, श्री राज दामोदर वाकोडे, नंदेश शंकरराव देशपांडे, अमित सत्यवान जामसंडेकर, आशिष सहदेव चव्हाण, वैशाली निमबाजीराव पाटील-जाधव, आबासाहेब धर्माजी शिंदे, फरहान परवेज दुबाश या १४ जणांची अतिरिक्त न्यायाधीश म्हणून मुंबई उच्च न्यायालयात नियुक्ती झाली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली होती केंद्राला शिफारस
सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने १९ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत या वकिलांच्या नावांची अतिरिक्त न्यायाधीशपदासाठी केंद्र सरकारला शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता.
अधिकृत आकडेवारीनुसार, मुंबई उच्च न्यायालयात १ ऑगस्टपर्यंत ९४ मंजूर पदांच्या तुलनेत फक्त ६६ न्यायाधीश कार्यरत होते. या न्यायालयात २८ न्यायाधीशांची कमतरता होती. अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. त्यानंतर त्यांना कायमस्वरुपी न्यायाधीश म्हणून पदोन्नती दिली जाते.