गेल्या 7 महिन्यातील आपत्कालीन दुर्घटनेमध्ये तब्बल 137 मुंबईकरांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 01:45 PM2019-09-06T13:45:21+5:302019-09-06T13:50:00+5:30

2019 जुलैपर्यंत मुंबईत तब्बल 9943 आपत्कालीन दुर्घटनेत तब्बल 137 लोकांचा बळी व 579 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

137 people were killed and 579 injured in Mumbai | गेल्या 7 महिन्यातील आपत्कालीन दुर्घटनेमध्ये तब्बल 137 मुंबईकरांचा बळी

गेल्या 7 महिन्यातील आपत्कालीन दुर्घटनेमध्ये तब्बल 137 मुंबईकरांचा बळी

Next

मुंबई - भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाते आणि मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानलं जातं. तरी 2019 जुलैपर्यंत मुंबईत तब्बल 9943 आपत्कालीन दुर्घटनेत तब्बल 137 लोकांचा बळी व 579 जण जखमी झाल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांस बृहन्मुंबई महानगरपालिकेनी दिली आहे. 

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी आपत्कालीन व्यस्थापन विभागाला 2019 मध्ये मुंबईत किती आपत्कालीन दुर्घटना झाल्या आहेत. तसेच दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे आणि किती जण जखमी झाले आहे याबाबत माहिती विचारली होती. सदर माहिती संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन व्यस्थापन विभागाचे जनमाहिती अधिकरी तथा उप प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी शकील अहमद शेख यांस माहिती अधिकार अधिनियम-2005 अन्वये माहिती दिलेली आहे. माहितीप्रमाणे 1 जानेवारीपासून 2019 जुलै पर्यंत एकूण 9943 आपत्कालीन दुर्घटनेत झाल्या आहे. दुर्घटनेत एकूण 137 लोकांचा मृत्यू झाला.  त्यामध्ये 92 पुरुष आणि 45 स्त्रियांचा समावेश आहे. एकूण 579 लोक दुर्घटनेत जखमी झाले असून त्यात 372 पुरुष आणि 207 स्त्रियांचा समावेश आहे. 

आपत्कालीन कोणत्या प्रकारच्या घटना

आपत्कालीन दुर्घटनेत झाडे / झाडांच्या फांद्या पडणे /  पडण्याच्या स्थितीत, दरड कोसळणे, घर / घरांचे भाग /  भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळणे /  तडे जाणे, आग /  शॉर्टसर्किट, गॅस गळती, रस्त्यावर ऑईल पडणे, समुद्रात / नाल्यात / नदीत /  विहिरीत / खाडीत / होलमध्ये पडणे, इतर अपघात, पक्षी / प्राणी / मनुष्य अडकणे, अन्न विषबाधा, पूल/पादचारी पूल पडणे इत्यादींची समावेश आहे.

माहितीप्रमाणे आग / शॉर्टसर्किटमुळे एकूण 3032 घटना झाल्या आहे. व एकूण 17 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 9 पुरुष आणि 8 स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण 127 लोक जखमी झाले असून त्यात 85 पुरुष आणि 42 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच घर / घरांचे भाग /  भिंती / इमारती / इमारतींचे भाग कोसळण्यामुळे एकूण 622 घटना झाली आहे. एकूण 51 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 26 पुरुष आणि 25 स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण 227 लोक जखमी झाले असून त्यात 124 पुरुष आणि 103 स्त्रियांचा समावेश आहे. 

झाडे / झाडांच्या फांद्या पडण्याच्या एकूण 3364 घटना झाली आहे. व एकूण 5 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 4 पुरुष आणि एका स्त्रिचा समावेश आहे. व एकूण 21 लोक जखमी झाले असून त्यात 14 पुरुष आणि 6 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच समुद्रात / नाल्यात / नदीत / विहिरीत / खाडीत पडण्यामुळे एकूण 103 घटना झाल्या आहे. एकूण 39 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 33 पुरुष आणि 6 स्त्रियांचा समावेश आहे.  एकूण 27 लोक जखमी झाले असून त्यात 23 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. 

दरड कोसळण्यामुळे एकूण 25 घटना घडल्या आहे. त्यात कोणत्याही जीवितहानी झाली नाही व फक्त एक पुरुष जखमी झाले आहे. तसेच शॉक लागण्याच्या एकूण 114 घटना आहेत. एकूण पाच लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 4 पुरुषांचे व एका स्त्रिचा समावेश आहे. व एकूण 13 लोक जखमी झाले असून त्यात 5 पुरुष आणि 8 स्त्रियांचा समावेश आहे. 

रस्ते खचणे/ खराब रस्त्यामुळे एकूण 161 घटना घडल्या आहे. व एकूण 11 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 11 पुरुषांचा समावेश आहे. व एकूण 53 लोक जखमी झाले असून त्यात 42 पुरुष आणि 11 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच पक्षी/प्राणी व मनुष्य अडकण्याची 399 घटना झाली आहे. त्यात कोणत्याही जीवितहानी झालेली नाही व फक्त एक पुरुष  जखमी झाले आहेत. पाणी तुंबण्याच्या एकूण 1351 घटना घडल्या आहे. त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पूल/पादचारी पूल पडणे/ पडण्याच्या स्थितीतबाबत  एकूण 67 घटना घडल्या आहे. व एकूण 6 लोकांचा  मृत्यू झाला असून त्यात 3 पुरुषांचा व 3 स्त्रियांचा समावेश आहे. व एकूण 34 लोक जखमी झाले असून त्यात 26 पुरुष आणि 8 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच अन्न विषबाधाची एकूण ५  घटना आहेत. त्यात कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. एकूण 34 लोक जखमी झाले असून त्यात 16 पुरुष आणि 18 स्त्रियांचा समावेश आहे. 

गॅस गळतीच्या एकूण 185 घटना घडल्या आहेत. एकूण 2 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 1 पुरुष आणि 41 स्त्रियांचा  समावेश आहे. व एकूण 15 लोक जखमी झाले असून त्यात 13 पुरुष आणि 2 स्त्रियांचा समावेश आहे. तसेच रस्त्यावर ऑईल पडण्याच्या एकूण 615 घटना घडल्या आहे. व एकूण 1 पुरुषचे  मृत्यू झाला व एकूण 27 लोक जखमी झाले असून त्यात 23 पुरुष आणि 4 स्त्रियांचा समावेश आहे. 2013 पासून 2018 पर्यंत तब्बल 49179 आपत्कालीन दुर्घटनेत 987 लोकांची बळी आणि 3066 जण जखमी झाले आहे.
 

Web Title: 137 people were killed and 579 injured in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.